पतीची अवस्था पाहून पत्नीला बसला मोठा धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने दारू पिण्यासाठी मज्जाव केल्यामुळे संतापलेल्या नवऱ्याने गळफास लावून घेतल्याची घटना बांदा शहरात घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
कोतवाली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत असलेल्या शुकुल कुआँ परिसरात ही घटना घडली आहे. नातेवाईकांनी सांगितले की, युवक दारू पिऊन घरात गोंधळ घालत असे. पत्नी दारू पिण्याकरिता त्याला सतत मज्जाव करत असायची. यामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. कमावलेले सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करत असे. घटनेच्या दिवशीही पत्नीने पतीला रात्री उशिरा दारू पिण्यास मनाई केली होती. त्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पतीला पाहून पत्नीला मोठा धक्का बसला. मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली. तो अचानक एवढं मोठे पाऊल उचलेल याची कल्पनाही नव्हती, असे मृताच्या नातेवाईकांनी सांगितलं. या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शहराचे डीएसपी गवेंद्र पाल गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कोतवाली पोलिस स्टेशन हद्दीतील शुकुल कुआँ येथे पती-पत्नीच्या वादातून एका व्यक्तीने आत्महत्या केली. या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर पुढची कायदेशीर कार्यवाही केली जाईल.’
क्रूरता! काकीला नको त्या अवस्थेत पाहिले चिमुकलीने अन् पुढे…
प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…
हृदयद्रावक! मुलीचा फोन पोलिस अधिकाऱ्यांनी उचलला अन् बसला धक्का…
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत युवक-युवती पार्टी करून आले अन्…
भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…