
मुंबई-पुणे द्रृतगती मार्गावर मोठा अपघात टळला; बसचा टायर फुटला…
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खाजगी बसला आज (शनिवार) मोठा अपघात झाला आहे. बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने ही बस निघाली होती. आढे गावच्या हद्दीत सकाळच्या सुमारास ही घटना घडली. बसचा टायर फुटल्यानंतर बसने अचानक पेट घेतला. अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. चालकाने प्रसंगावधान दाखवत सर्व प्रवाश्यांना सुखरूप खाली उतरवले त्यामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही आहे, सर्व प्रवासी सुखरुप आहे.
दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि आग आटोक्यात आणली. या घटनेत बसचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला जखम झालेली नाही.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…
थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…
पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

