पिंपरीमध्ये दोघांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने चिरडले अन्…
पुणेः भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 20) रात्री साडेदहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी-चिंचवड येथे बिग बाजार समोर झाला. छत्राराम रामजी चौधरी (वय 45, रा. रावेत), आछलाराम दर्गाजी चौधरी (वय 50, रा. चिंचवडगाव) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत.
ट्रक चालक रामेश्वर तुळशीराम जाधव (वय 23, रा. शिंदेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक, मूळगाव कारली, जि. वाशिम) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आछलाराम हे एलआयसी एजंट होते. छत्राराम हे सौंदर्य प्रसाधनांचे ठोक विक्रेते होते. दोघेही एका दुचाकीवरून पुणे येथून चिंचवड येथे जात होते. त्यावेळी चालक रामेश्वर जाधव याच्या ताब्यातील ट्रकने आछलाराम आणि छत्राराम यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही दुचाकीवरून खाली पडले. त्यानंतर ट्रकचे चाक दोघांच्या डोक्यावरून जाऊन ते चिरडले गेले.
अपघाताबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आछलाराम आणि छत्राराम या दोघांनाही पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. पिंपरी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; कुटुंबावर काळाचा घाला…
पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघात, तीन ठार…
भाविकांच्या बसला भीषण अपघात; ११ जागीच ठार; अनेकांना चिरडले…
शिक्षक पती-पत्नीचा भीषण अपघातात जागीच मृत्यू; मुलगा गंभीर…
Video: रायगडमधील भीषण अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद…