Video News: पोलिसकाकाच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

ट्रेनी आयएएस पूजा खेडकर यांची अखेर बदली
पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर पुण्यातून वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले
पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांनी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवून दोन वाहनांना धडक दिल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत.

नागपूरमध्ये स्कूल बसच्या धडकेत सायकलस्वार वृद्धाचा मृत्यू
नागपूर : स्कूल बसने सायकस्वार वृद्धाला उडवल्यानंतर वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. रत्नाकर रामचंद्र दीक्षित (वय 63) असे या व्यक्तीचे नाव आहे.

मुंबईत बाप-लेकाने घट्ट मिठी मारून रेल्वेखाली केली आत्महत्या
मुंबईः मुंबईतील भाईंदर रेल्वे स्थानकावर जाऊन बाप-लेकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंगावर काटा आणणारे फुटेज सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.

वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा साप चावल्याने मृत्यू
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वाढदिवसाच्या दिवशी हातात विषारी साप घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केल्याने संतोष जगदाळे या युवकाचा साप चावल्याने मृत्यू झाला आहे.

नाशिकमध्येही हिट ऍण्ड रनचा धक्कादायक प्रकार समोर
नाशिक : नाशिकमध्येही हिट ऍण्ड रनचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सातपूर रोडवर एका भरधाव कारने अर्चना किशोर शिंदे या महिलेला चिरडले आहे. संशयित कार आणि कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

एसटी बसमध्ये कंडक्टरला वाहकाने केली मारहाण
नांदेडः एसटी बस मधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीला तिकीट काढण्यासाठी सांगितल्याने त्या प्रवाशाने वाहकाला मारहाण केली. एका चापटीत वाहक बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात प्रवासी सूर्यकांत किरतवाड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘सैराट’ची पुनरावृत्ती
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरधर्मीय विवाह केल्याने अमीर शेख (वय 25) या युवकाची हत्या करण्यात आली आहे. मयत अमीर शेख याने पंकज विश्वनाथ पाईकराव याच्या मेव्हणीसोबत आंतरधर्मीय लग्न केले होते.

सांगलीत वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह 3 दिवसांनी सापडला
सांगली : शहरातील हनुमाननगर येथील एक युवक सेल्फी घेताना तोल जाऊन पाण्यात पडला होता. तिन दिवसांनी त्याचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात तीन दिवसांनी आढळून आला आहे. मोईन मोमीन (वय 24) असे मृत युवकाचे नाव आहे.

नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून विवाहितेचे टोकाचे पाऊल
नाशिकः नाशिकमध्ये प्रेम प्रकरणातून एका विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. महिलेने सातपूर पोलिस स्टेशन समोरच हाताची नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!