Ex IPS शिवदीप लांडे यांची नवी इनिंग सुरू…

पाटणा (बिहार): महाराष्ट्रातील शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई आणि Ex IPS शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. पाटणा येथे आज (मंगळवार) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या पक्षाची घोषणा केली. पक्षाचे नाव ‘हिंद सेना’ ठेवले आहे. यावेळी शिवदीप लांडे यांनी बिहारमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

Ex IPS शिवदीप लांडे यांनी १३ जानेवारीला म्हणजेच राजीनामा दिल्यानंतर ११७ दिवसांनी लांडे यांचा राजीनामा स्विकारण्यात आला आहे. शिवदीप लांडे यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. ते बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. शिवदीप लांडे हे मुळचे महाराष्ट्रातील असून त्यांचा जन्म अकोल्यात झाला आहे. महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी राहिली असली तरी त्यांची कर्मभूमी बिहार राहिली आहे. सिंघम अधिकारी म्हणून त्यांची बिहारमध्ये ओळख आहे. बिहारची राजधानी पाटणा, अररिया आणि पूर्णिया जिल्ह्याचे एसपी म्हणून त्यांनी कामकाज पाहिले आहे. यानंतर ते राज्यपालांचे एडीसी देखील राहिले आहेत. काही काळासाठी त्यांची महाराष्ट्रात देखील बदली झाली होती. तेव्हा ते एटीएसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी होते. आपल्या दबंगगिरीमुळे ते बिहारमधील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आता त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.

शिवदीप लांडे म्हणाले, “आम्ही आणि माझा पक्ष बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना बिहारमध्ये बदल करायचा आहे किंवा ज्यांना बिहारमध्ये बदल हवा आहे, त्या सर्वांचे पक्षात स्वागत असेल. बिहारमधील युवकांना बदल हवा आहे. अनेक राजकीय पक्षांनी मला राज्यसभेवर पाठवण्याची, मंत्री आणि मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याची ऑफर दिली आहे, पण मला बिहारमध्ये बदल करायचा आहे, म्हणून मी नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.’

बिहारचे दबंग ips अधिकारी शिवदीप लांडे कोणत्या पक्षात प्रवेश करणार…

सिंघम IPS शिवदीप लांडे यांचा पोलिस सेवेतून राजीनामा; कोण आहेत शिवदीप लांडे…

IPS अधिकाऱ्याची पत्नी आमदार मेघना बोर्डीकर यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी…

IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…

मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…

Video: Ex IPS रविंद्रनाथ पाटील यांनी येरवडा कारागृहातील दिली धक्कादायक माहिती…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!