पत्नीचा खून अन् आत्महत्येपूर्वी मुलासाठी काढले विमानाचे तिकीट…

मुंबई: मुंबईतील गोरेगाव भागातील जवार नगर येथे पेडणेकर दाम्पत्याचे मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली होती. एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये महिलेचा मृतदेह तर इमारतीच्या आवारात एका व्यक्तीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला आहे. गोरेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

किशोर पेडणेकर (वय ५८) व राजश्री पेडणेकर (वय ५५) अशी मृतांची नावे आहेत. किशोर पेडणेकर यांनी आत्महत्येपूर्वी आपल्या नातेवाईकाला मेसेज केला होता. यामध्ये त्यांची मालमत्ता कुठे आहे, याची माहिती देण्यात आली होती. तसेच मुलाला आपल्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्वरित मुंबई गाठता यावे, यासाठी त्यांनी मुलाच्या नावाने दिल्ली-मुंबई विमानाचे तिकीटही बूक करुन ठेवले होते.

गोरेगाव येथील एका गृहनिर्माण संस्थेत शुक्रवारी पन्नाशीतील जोडपे मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. किशोर पेडणेकर या व्यक्तीने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. किशोरने प्रथम पत्नी राजश्रीचा गळा आवळून खून केला आणि नंतर इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती तपासातून पुढे आली आहे. राजश्री पेडणेकर या व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होत्या. दरम्यान, गेल्या दोन-अडीच वर्षापासून किशोर पेडणेकर हे तणावात होते. तसेच त्यांना उच्च मधुमेहही होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: यशश्री शिंदे हत्याप्रकरणाच्या पोलिसांनी दाऊदला घटनास्थळी नेले अन्…

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

UPSC करणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थीनीची दिल्लीत आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…

भरधाव फॉर्च्युनरने प्राध्यापिकेला चिरडलं; उपचारादरम्यान मृत्यू…

ऑनर किलिंग! वडील मलाही संपवतील; विद्याचा मन सुन्न करणारा आर्त टाहो…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!