हृदद्रावक! सुसाईड नोटमधील ऐकून कुटुंबाला झाले अश्रू अनावर…
चंद्रपूर: बल्लारपूर येथील पेपर मिल कंपनी आणि कंत्राटदारांच्या छळाला कंटाळून एका कंत्राटी कामगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. सुधीर लोखंडे असे या कामगाराचे नाव आहे. त्यांच्या मागे आई, पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे.
बल्लारपूरच्या विद्यानगर येथे राहणारा सुधीर हे पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. पण, नऊ महिन्यापूर्वी त्यांना कंपनीने कामावरून कमी केले. त्यामुळे ते सध्या बेरोजगार होते. आईची तब्येत बिघडली होती. त्यामुळे मानसिक आणि आर्थिक दडपण आले होते. याला कंटाळून अखेर सुधीर लोखंडे यांनी मृत्यूला कवटाळले. त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
पोलिसांनी सुधीरचा मृतदेह खाली उतरवून तो पोस्टमोर्टमला पाठवला. पोलिसांनी तपास केला असता सुधीरच्या खिशात १ सुसाईड नोट आढळली. त्यात सुधीरने जे काही लिहिलं हे ऐकून कुटुंबाला अश्रू अनावर झाले.
सुधीरच्या सुसाईड नोटमध्ये पेपर मिल डीजीएम अजय दुरटकर आणि कंत्राटदार संजय दानव यांनी छळल्याचा आरोप केला आहे. सुधीरने या दोघांना शिक्षा द्यावी अशी मागणी केली. सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर कलम ३०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याचसोबत सुधीरच्या नोटमध्ये म्हटले होते की, माझ्या खिशात १ हजार रुपये आहेत, त्यातून अंत्यसंस्कार करा.
सुधीरचे नातेवाईक जयदास भगत यांनी सांगितले की, ‘सुधीर मागील २५ वर्षापासून बल्लारपूरच्या पेपर मिलमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करत होते. महिन्यापूर्वी कंत्राटदाराने सुधीरला कामावरून काढून टाकले. तेव्हापासून ते तणावात आहे. पेपर मिल अधिकारी आणि कंत्राटदार यांची अनेकदा भेट घेतली. परंतु, त्याला काम मिळाले नाही. मानसिक छळ आणि आर्थिक दडपणाखाली येऊन त्याने अखेर जीवन संपवले.’
हृदयद्रावक! पोत्यात साप समजून कोणी जवळ जात नव्हते, पण…
हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…
हृदयद्रावक! क्षणभर छोट्या भावाला काहीच उमगलंच नाही…
हृदयद्रावक! फलटणमधील पिता-पुत्र जेवण करून झोपले अन्…
अहमदनगर हादरले! नवरा-बायकोच्या भांडणानंतर बापाने फेकले चिमुकल्यांना विहीरीत…