मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश…

पुणे (संदीप कद्रे): पुण्यासह महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोडया करणारा रेकॉर्ड वरील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार जेरबंद करण्यात युनिट ६ गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरातील जबरी चोरी, घरफोडी व वाहनचोरी या गुन्हयांना आळा बसावा या करीता तीव्र मोहिम राबवून कारवाई करणेबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी आदेशित केले होते. लोणी काळभोर पोलिस ठाणे गु.र.नं. ५२५ / २०२३ भा.दं. वि. कलम ४५४, ४५७, ३८०, ४११, ३४ या गुन्हयाचा तपास युनिट ६, मार्फत चालू असताना पो.ना. ७३१७ नितिन मुंडे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरिल गुन्हेगार सोनू ऊर्फ संजिव टाक (रा. हडपसर पुणे) याने केलेला असून तो मांजरी बुद्रुक स्मशानभुमीजवळ मांजरी पुणे येथे येणार आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट ६, पुणे शहर यांचे आदेशानुसार युनिट कडील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक (वय २८ वर्षे रा. स.नं. १४, शाळा नंबर १०० मागे, तुळजा भवानी वसाहत, गाडीतळ हडपसर पुणे) यास २६/०८/२०२३ रोजी ताब्यात घेतले आहे.

सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक याला विश्वासात घेऊन दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता प्राथमिक तपासात सदरचा गुन्हा त्याचे साथीदारांसह केल्याची कबुली दिली. त्यास २६/०८/२०२३ रोजी १७/१० वाजता अटक अटक करुन त्याची पोलिस कस्टडीची रिमांड घेण्यात आली. रिमांड मुदतीत त्याचेकडे तपास करता त्याने सदरचा गुन्हा साथीदार पंकजसिंग दुधानी रा. अंबरनाथ याचेसह केला असल्याचे सांगून मुद्देमाल काढून देत असले बाबत निवेदन केल्याने त्याचे निवेदना प्रमाणे गेलो असता आरोपीने सोन्या, चांदीचे दागिनेंची तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची ठिकाणे दाखवून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण २,६३,५००/- रु. किमतीचा मुद्देमाल काढून दिल्याने तो मेमोरंडम पंचनाम्याने जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये खालील पो.स्टे कडील एकुण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.
१) विमानतळ पोलिस स्टेशन गु.रं. नं- ३४७/२०२३ भा.द.वि.कलम.३८०,४५७,४५४
२) विमानतळ पोलिस स्टेशन गु.रं. नं-२६१ / २०२३ भा.द.वि. कलम.३८०,४५७,४५४
३) येरवडा पोलिस स्टेशन गु.रं. नं-४४१ / २०२३ भा.द.वि. कलम. ३८०,४५७,४५४
४) हडपसर पोलिस स्टेशन गु.रं. नं-१४५६/२०२२ भा.द.वि. कलम.३८०,४५४
५) हडपसर पोलिस स्टेशन गु.रं. नं-४७१/२०२३ भा.द.वि. कलम. ३८०,४५७,४५४
६) लोणीकंद पोलिस स्टेशन गु.रं. नं-१२५/२०२२ भा.द.वि. कलम.३८०,४५७,४५४
७) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गु.रं. नं-५७७/२०२२ भा.द.वि. कलम.३८०,४५७,४५४
८) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गु.रं. नं-५११/२०२३ भा.द.वि.कलम.३८०,४५७,
९) लोणीकाळभोर पोलिस स्टेशन गु.रं. नं-५२५/२०२३ भा.द.वि. कलम.३८०,४५७,४५४,४११

आरोपीकडे तपास करता तो महाराष्ट्रातील खालील पो. स्टे चे गुन्हयातील पाहिजे आरोपी असल्याचे उघडकीस आले आहे.
१) कराड पो.स्टे जिल्हा सातारा गु.र.नं. ७३१ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९५
२) रोहा पोलिस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. २२४ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५७, ३८०
३) सावर्डे पोलिस स्टेशन जिल्हा सांगली गु.र.नं. १२१ / २०२३ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०
४) मानवत पोलिस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ३५४/२०२२ भा.दं.वि.कलम ३७९
५) शेवगाव पोलिस स्टेशन जिल्हा परभणी गु.र.नं. ९०३ / २०२२ भा.दं.वि.कलम ३७९
६) माणगाव पोलिस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. ३५९ / २०२२ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०
भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८० भा.दं.वि. कलम ३७९ भा.दं.वि. कलम ३७९
७) पाली पोलिस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७० / २०२२
८) महाड पोलिस स्टेशन जिल्हा रायगड गु.र.नं. १७३ / २०२२
९) रायसोनी पोलिस स्टेशन जिल्हा ठाणे गु.र.नं. १४३ / २०२३
१०) सावर्डे पोलिस स्टेशन जिल्ळा सांगली गु.र.नं. ४३ / २०२३
११) अंबरनाथ पोलिस स्टेशन जि. ठाणे गु.र. नं. ७५० / २०२३ भा.दं.वि. कलम ३९९,४०२, आर्म अॅक्ट कलम ४ (२५), महा. पो. कायदा कलम ३७ (१) सह १३५ भा.दं.वि. कलम ४५४, ४५७, ३८०

आरोपी सोनू ऊर्फ संजिव कपूरसिंग टाक यास न्यायालयाने ०१/०९/२०२३ रोजी पर्यंत पोलिस कस्टडीची रिमांड दिली आहे. नमूद गुन्हयातील सोन्याची अंगठी त्याने त्याची आई नामे मिना कपूरसिंग टाक हिला दिल्याने तीचाही गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमूद गुन्हयाचा तपास मा. रजनीश निर्मल, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शेळके, पोलिस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-६, पुणे शहर हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त रितेश कुमार, संदिप कर्णिक, सह पोलिस आयुक्त, रामनाथ पोकळे, अपर पोलिस आयुक्त, गुन्हे, अमोल झेंडे, पोलिस उपआयुक्त, गुन्हे, सतिश गोवेकर, सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे – २ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, रजनीश निर्मल पोलिस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, सुरेश जायभाय, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, नितीन मुंडे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहीगुडे, प्रमोद मोहिते, कानिफनाथ कारखेले, ऋषिकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, आशफाक मुलाणी, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

Video: पुणे शहरातील कोयता गॅंगच्या दहशतीचा व्हिडीओ व्हायरल…

पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!