पुणे-नगर महामार्गावरून गुन्हे शाखा युनिट ६ ने दोघांना ताब्यात घेतले अन्…
पुणे (संदीप कद्रे): पुणे-नगर महामार्गावर पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट ६ ने दोन आरोपींना अटक केली आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हडपसर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
युनिट ६ कडील पोलिस अधिकारी व अंमलदार हे युनिट हद्दीत शुक्रवारी (ता. २८) पेट्रोलिंग करत होते. पो.अं 8203 सचिन पवार यांना माहिती मिळाली की, पुणे-नगर हायवेवर दोन जण मोटार सायकलसह संशयित रित्या थांबलेले आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहिती वपोनि रजनीश निर्मल यांना कळवून त्यांनी बातमी प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केले. स्टाफने तात्काळ रवाना होऊन सदर दोन जणांना ताब्यात घेतले. 1) अनिकेत कैलाश कांबळे वय 20 वर्षे रा, फुलेनगर, येरवडा, पुणे 2) आनंद अर्जुन कांबळे वय 30 वर्षे रा. फुलेनगर, येरवडा, पुणे अशी दोघांची नावे आहेत.
दोघांना त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल बाबत त्यांचेकडे विचारणा केली असता ते उडवा उडवीची उत्तरे दिल्याने गाडीबाबत अधिक माहिती घेतली असता सदरबाबत हडपसर पो स्टे गु र नं 193/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद असलेबाबत समजले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता गुन्ह्याबाबत कबुली दिल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे. दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी हडपसर पोलिस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे.
सदरची कामगिरी रामनाथ पोकळे अप्पर पोलिस आयुक्त गुन्हे, अमोल झेंडे पोलिस उप आयुक्त गुन्हे, सतीश गोवेकर सहा. पोलिस आयुक्त सो गुन्हे २ या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलिस उप निरिक्षक सुरेश जायभाय, पोहवा वाळके, पो ना विठ्ठल खेडकर, पो अं ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे, सचिन पवार या पथकाने केलेली आहे.
पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
पुणे शहरात गस्त दरम्यान पकडलेला निघाला उस्मानाबाद आरोपी…
येरवडामधील जेल कर्मचाऱ्याची प्रेमसंबंधातून आत्महत्या; गुन्हा दाखल…
विमानतळ पोलिसांनी आंतरराज्यीय अट्टल वाहनचोरास केले गजाआड…