पुणे हादरले! एकटेपणाला कंटाळून आजोबांनी घेतला जगाचा निरोप…

पुणे : एकटेपणा आणि आजारपणाला कंटाळून कोथरूडमधील मयूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३) दुपारी घडली आहे. मकरंद महादेव मेंगाळे (वय ८९) असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे.

मयूर कॉलनीतील एका इमारतीत मकरंद मेंगाळे राहत होते. त्यांना तीन मुले आहेत. दोन मुले नोकरीनिमित्त अमेरिकेत स्थायिक झाली, तर एक मुलगा मुंबईत आहे. मकरंद एकटेच राहत होते. त्यांच्या देखभालीसाठी मुलांनी २४ तास ‘केअर टेकर’ ठेवला होता. तो त्यांना दोन वेळा जेवण आणून द्यायचा. मकरंद यांची शुश्रूशा करायचा. मकरंद यांच्या मुलांनी फ्लॅटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. मकरंद यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा विकार होता. त्यांना चालताही येत नव्हते. ते वॉकर घेऊन चालायचे. रविवारी दुपारी एकच्या सुमारास मकरंद यांना डबा आणण्यासाठी कामगार घरातून बाहेर पडला. मकरंद वॉकर घेऊन गॅलरीत आले. गॅलरीतून ते उडी मारण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी इमारतीसमोर थांबलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी त्यांना उडी मारू नका, असे सांगितले. पण मकरंद यांनी गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली, अशी माहिती कोथरूड पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मेंगाळे यांच्या पत्नीचे पूर्वीच निधन झालेले आहे. त्यामुळे मेंगाळे पुण्यात एकटेच राहत होते. मेंगाळे हे भारतीय रेल्वेत अभियांत्रिकी विभागात नोकरीस होते. तेथून ते सेवानिवृत्त झाले. मेंगाळे यांना काही वर्षांपासून उच्च रक्तदाब आणि मधूमेह होता. आजारपण आणि वयोमान यामुळे त्यांना उभेही राहता येत नव्हते. त्यामुळे त्यांच्या चालण्यावर बंधने होती. ते ‘वॉकर’च्या साह्याने चालत असत.

मेंगाळे घरात एकटे राहत असल्याने त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी मुलाने घरामध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले होते. वडील काय करतायेत, ‘केअर टेकर’ त्यांची नीट काळजी घेत आहे ना, हे मुलगा त्याद्वारे पाहत असे. पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण पाहिले. त्यामध्ये ‘केअर टेकर’ मेंगाळे यांच्याशी बोलून घराबाहेर पडल्याचे दिसून येते. त्यानंतर काही वेळाने मेंगाळे ‘वॉकर’ घेऊन घराबाहेर पडल्याचे दिसून आले.

आजारपण आणि एकटेपणाला कंटाळून मकरंद मेंगाळे यांनी आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यांच्या मुलाला घडलेली घटना कळवल्यानंतर तो मुंबईवरून पुण्यात आला. मेंगाळे यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले, अशी माहिती कोथरूड स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली.

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…

पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…

पुणे शहरात मैत्रिणीला भेटण्यासाठी घातला बुरखा अन् पुढे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!