उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला; आरोपीला अटक…
सोलापूर : उद्योजक आणि समाजसेवक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. राणा सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते. त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर […]
अधिक वाचा...आई-वडिलांची हत्या करून विमा कंपन्यांकडून लुटले पैसे; पत्नीच्या मृत्यूची चौकशी…
लखनौ (उत्तर प्रदेश): एकाने आईची हत्या केली आणि तिच्या नावाने कंपनीकडून 22 लाख रुपयांचा विमा दावा केला. वडिलांची हत्या केली आणि विमा कंपन्यांकडून 39 कोटी रुपयांचा दावा केला. एका कंपनीने त्याला 1.5 कोटी रुपये तर दिले. इन्शुरन्स कंपनीने पैसे देण्याआधी चौकशी सुरू केली. तपासात असे दिसून आले की आरोपीने वेगवेगळ्या स्त्रोतांकडून 50 हून अधिक विमा […]
अधिक वाचा...कर्जाचा ओझं! पत्नीची आत्महत्या अन् अंत्यसंस्कारानंतर पतीने लावला गळ्याला दोर…
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीचे अंत्यसंस्कार उरकून पतीनेही त्याच विहिरीपासून अवघ्या पाच फूट अंतरावर जीवन संपवले. मृत पतीचे नाव विलास रामभाऊ जमधडे (वय ४३, रा. आळंद) असे आहे.कर्जाच्या ओझ्यामुळे पत्नीने व आपणही आत्महत्या करत असल्याचे जमधडे यांनी व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये म्हटले आहे. विलास जमधडे […]
अधिक वाचा...विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या बाबा चैतन्यनंदच्या आवळल्या मुसक्या…
नवी दिल्ली: श्री शारदा इन्स्टिट्यूटमध्ये 17 विद्यार्थींनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली बाबा चैतन्यनंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी याच्या मुसक्या आवळल्या. आज (रविवार) पहाटेच्या सुमारास चैतन्यानंदला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील एका महाविद्यालयात 17 मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या बाबा चैतन्यनंद स्वामी उर्फ पार्थ सारथी मागील काही दिवसांपासून पसार झाला होता. अटक टाळण्यासाठी कोर्टातही धाव घेतली […]
अधिक वाचा...गुंड निलेश घायवळ याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आली समोर…
पुणे : गुंड निलेश घायवळ सध्या लंडनमध्ये असून, त्याला पासपोर्ट कुठून मिळाला याची माहिती आता समोर आली आहे. पुण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याने निलेश घायवळ याने अहिल्यानगरमधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. पण त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. […]
अधिक वाचा...Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…
चेन्नई (तमिळनाडू): करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 33 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. VIDEO | TVK leader Vijay pauses speech in Karur, distributes water to people, arranges for ambulance for […]
अधिक वाचा...पुणे! एका १४ मजली इमारतीला लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू…
पुणे (संदिप कद्रे): एका १४ मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एका १५ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. या आगीमध्ये संपूर्ण सदनिका जळाली असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. पुण्यातील उंड्री येथील जगदंबा भवन रोडवरील मार्वल आयडियल स्पेसिओ सोसायटीच्या १२व्या मजल्यावर शुक्रवारी दुपारी आग लागली. […]
अधिक वाचा...नाशिक! माझ्या हॉटेलमध्ये कॉलगर्ल्स पुरवल्या जातात, आता तुम्ही तेच काम करा…
नाशिक : नाशिक शहरातील म्हसरूळ परिसरात एक व्यावसायिक फोटोग्राफर युवती व तिच्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये जबरदस्तीने डांबून, पिस्तुलाचा धाक दाखवत अनैतिक व्यवसाय करण्याबाबत सांगितल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात हॉटेलचालकासह त्याच्या साथीदाराविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेत पीडित युवतीने सुरुवातीला भीतीपोटी तक्रार केली नव्हती. […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य आरोपी असलेला निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या कोथरुड येथील घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून […]
अधिक वाचा...पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…
पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वर्षभरापासून न्यायालयीन लढाई […]
अधिक वाचा...
