
पुणे पोलिसांनी आरोपींची काढली धिंड; निलेश घायवळ लंडनला…
पुणे : पुणे शहरातील कोथरूड भागात झालेल्या गोळीबार प्रकरणी गुंड निलेश घायवळ याच्यासह 10 जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्य आरोपी असलेला निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली असून, पोलिसांनी त्याच्या कोथरुड येथील घरावर धाड टाकली. या धाडीत त्याच्या घरातून 2 स्कॉर्पिओ आणि 2 दुचाकी जप्त केल्या आहेत.
निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्याच्याबाबत लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. निलेश घायवळने गुन्हेगारी कृत्यामधुन मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतले आहे. निलेशचा मुलगाही लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितले. त्यामुळेच, पोलिसांनी आता त्याच्या कोथरुड येथील घरातून कारवाईला सुरुवात केली आहे.
लंडनला पळून गेलेल्या गुंड निलेश घायवळच्या पुण्यातील कोथरुड भागातील घराची पुणे पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास झाडाझडती घेतली. यावेळी घायवळच्या दोन स्कोर्पिओ आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. निलेश घायवळला पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. तसेच, यापूर्वीच त्याच्याबाबत लुक आऊट नोटीस जारी करण्यात आल्याने त्याला भारतात आल्यास कधीही अटक होऊ शकते. याशिवाय, कोथरुडमधील हल्ल्यात सहभागी असलेल्या इतर सात आरोपींच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली.
कोथरुडमध्ये 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री नागरिकांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोथरुड भागातील 7 आरोपींची कोथरुड भागातून पोलिसांनी धींड देखील काढली. सायंकाळच्या सुमारास तोंडावर काळे कापड बांधून पोलिसांनी आरोपीला भररस्त्यातून मिरवल्याने कोथरुडसह पुण्यातील गुन्हेगारी वर्तुळात याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
पुण्यात घायवळ गँगचे मध्यरात्री 2 कांड; पाहा काय-काय केलं…
पुणे! घायवळ टोळीकडून शुल्लक कारणावरून भररस्त्यात एकावर गोळीबार…
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; सराईत गुंडांना डांबलं तुरुंगात…

