
Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…
चेन्नई (तमिळनाडू): करूर जिल्ह्यात तमिळगा वेत्री कळगम प्रमुख आणि अभिनेते विजय यांच्या मोठ्या राजकीय सभेत प्रचंड गर्दी झाली. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत किमान 33 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण बेशुद्ध पडले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
VIDEO | TVK leader Vijay pauses speech in Karur, distributes water to people, arranges for ambulance for those in the crowd feeling suffocated.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/uCBNuilCBZ
— Press Trust of India (@PTI_News) September 27, 2025
गर्दी आणि चेंगराचेंगरीमुळे विजय यांनी आपलं भाषण थांबवलं आणि “पोलिसांनी मदत करा” अशी हाक दिली. लोक बेशुद्ध पडल्यावर त्यांनी पाणी बाटल्या प्रेक्षकांत टाकल्या आणि रुग्णवाहिका बोलावून श्वास गुदमरलेल्या लोकांना रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, विजय यांच्या भाषणादरम्यान गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि लोकांना श्वास घेणं अवघड झालं. अनेक कार्यकर्त्यांनी परिस्थितीची जाणीव होताच सतर्कतेचा इशारा दिला. मात्र रुग्णवाहिकांना गच्च भरलेल्या गर्दीतून वाट काढणं अवघड झालं. बेशुद्ध पडलेल्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी काहींचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
அமைதியா இருந்த கரூரை கலவர பூமியா மாத்திட்ட தற்குறி விஜய்.. 😰😰
கரூரில் மூன்று குழந்தைகள் உட்பட 10 பேர் உயிரிழந்திருப்பதாக தகவல்
மக்களுக்காக களத்தில் இறங்கிய @V_Senthilbalaji 🙏🙏#சனியின்_பயணம் #தற்குறியின்_பயணம் pic.twitter.com/c2TAU2wHUU
— Kovai Nithya (@KovaiNithya) September 27, 2025
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी तातडीने मंत्री अनबिल महेश आणि मा. सुब्रमणियन यांना घटनास्थळी पाठवण्याचे आदेश दिले.

