
आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाबाबत पोलिसांकडून मोठा खुलासा…
मुंबई : मुंबईच्या मालाडमधील एक महिला आईस्किम खात असताना बोट सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता ते बोट कुणाचं याबाबत पोलिसांना मोठी माहिती मिळाली आहे.
मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या एका कुटुंबानेरात्री झेप्टो ॲपद्वारे यम्मो कंपनीच्या 3 आईस्क्रीम ऑर्डर केली होती. या कुटुंबातील एका महिलेने बटरस्कॉच आईस्क्रीम खाल्लं तेव्हा तिला त्याच्या तोंडात मांसाच्या तुकड्यासारखे काहीतरी वाटले. महिलेने अर्ध्याहून अधिक आईस्क्रीम खाल्ली होती. जेव्हा तिनं आइस्क्रीमकडे पाहिलं तेव्हा तिला त्यात मानवी बोट दिसले. सुमारे 2 सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा हे पाहून महिलेला धक्का बसला.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
महिलेनं तत्काळ आईस्क्रीम कंपनी yummo.icecream या इन्स्टाग्रामवरील पेजवर तक्रार नोंदवली आणि कंपनीच्या कस्टमर केअरलाही माहिती दिली. महिलेनं याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मालाड पोलिसांनी लगेचच आईस्क्रीम जप्त केली. प्राथमिक तपासात पोलिसांनी आइस्क्रीम कोनमध्ये मानवी शरीराचा अवयव आढळल्याचे सांगितले. अधिक पुष्टीकरणासाठी पोलिसांनी आइस्क्रीममध्ये सापडलेला मानवी शरीराचा भाग FSL (फॉरेन्सिक) कडे पाठवला.
मालाड पोलिसांनी यम्मो आईस्क्रीम कंपनीविरुद्ध आयपीसी 272,273,336 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील हडपसर परिसरात छापा टाकण्यात आला. दरम्यान यावर यम्मो आईस्क्रीम कंपनीने उत्तर दिले आहे. ‘आम्ही या आईस्क्रिमक थर्ड पार्टी उत्पादन करत होतो. ते आता थांबवले आहे. तसेच आमच्या गोदामांमध्ये असलेले सर्व उत्पादन नष्ट करत आहोत. बाजारात असलेला माल परत घेत आहोत’, असे कंपनीने सांगितले होते.
मुंबई पोलिसांना पुणे फॅक्ट्रीमध्ये एक व्यक्ती जखमी असल्याची सापडली. या व्यक्तीच्या हाताला जखम झाली आहे. आईस्क्रिममधील ते बोट याच व्यक्तीचे असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी व्यक्तीचे डीएनए आणि वैद्यकीय तपासणी केली आहे. आता त्याच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
Video: आईस्क्रीममध्ये बोटानंतर सापडली गोम…
मुंबईत आईस्क्रिममध्ये सापडलेल्या बोटाचे पुणे कनेक्शन; कंपनी म्हणाली…
मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोनमध्ये सापडलं माणसाचं बोट…
संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…
नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…
हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…
डॉक्टर पतीच्या त्रासाला कंटाळून डॉक्टर पत्नीची आत्महत्या…
क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
मुंबई विमानतळावर महिलांची सोन्याची तस्करी करण्याची पद्धत पाहून अधिकारी चक्रावले…

