धक्कादायक! डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या महिलेचा केला विनयभंग…
जळगाव: एक महिला पोट दुखत असल्याने उपचारासाठी डॉक्टरांकडे गेली होती. मात्र, उपचारासाठी आलेल्या या महिलेचा डॉक्टरने विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना अमळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा डॉक्टर अनिल शिंदे यांच्याविरुद्ध विनयभंगासह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेचे पोट दुखत असल्याने महिलेने धुळे येथील एका रुग्णालयात तपासणी केली. […]
अधिक वाचा...नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…
काठमांडू (नेपाळ): नेपाळमधील बारा जिल्ह्यात बसला झालेल्या भीषण अपघातात ७ जण मृत्यूमुखी पडले आहेत. या सात पैकी सहा जण हे भारतीय भाविक असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात १९ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नेपाळ पोलिसांनी ही माहिती दिल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. नेपाळमध्ये बुधवारीसुद्धा भीषण अपघात झाला होता. […]
अधिक वाचा...पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…
पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पालिस स्टेशन हद्दीमधील प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याच्या ०२ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५२वी कारवाई आहे. विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे ०९/०८/२०२३ रोजी गु.र.नं. […]
अधिक वाचा...माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…
आईने झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून छ. संभाजीनगर: एका आईनेच आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील फुलेनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल […]
अधिक वाचा...हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…
पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्यानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होते. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. हे पाहून ट्रक चालक फरार झाला तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रामदास वडजे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडीच्या लक्ष्मी […]
अधिक वाचा...गोंदिया जिल्ह्यात पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई…
गोंदिया (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरोडा पोलिसांची अवैध धंद्यांविरुद्ध धडक कारवाई केली असून, 5 लाख 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती करून विक्री करीता हॉटस्पॉट ठरलेल्या तिरोडा येथील संत रविदास वॉर्ड, इंदिराटोली परिसरातील अवैध […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड परिसरात कोयत्याचा धाक दाखवून चोरी करणारी टोळी जेरबंद…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड परिसरात धारदार कोयत्याचा धाक दाखवून सोनसाखळी, मोबाईल चोरी, वाहनचोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट २ ला यश आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये महीलांच्या गळयातील सोन्याचे दागीने हिसडा मारुन चोरणारे, नागरिकांचे महागडे मोबाईल जबरीचोरी करणारे व वाहनचोरीचे गुन्हे करणा-या […]
अधिक वाचा...लोणावळा येथे संकल्प नशामुक्ती अंतर्गत नशेखोरांना न्यायालयाने ठोठावला दंड…
लोणावळा (संदीप कद्रे): संकल्प नशामुक्ती अंतर्गत ८ नशेखोरांवर कारवाई करण्यात आली असून, न्यायालयाने दंड ठोठावला आहे. यामुळे नशेखोरांचे धाबे दणाणले आहेत. पोलिस अधिक्षक अंकित गोयल, पुणे ग्रामीण व सहा. पोलिस अधिक्षक सत्यासाई कार्तिक लोणावळा उपविभाग यांचे संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “संकल्प नशामुक्ती” या अभियानाच्या माध्यामातून लोणावळा शहर पोलिस स्टेशन हद्दीत ‘गांजा’ या मादक पदार्थाचे सेवन […]
अधिक वाचा...पुणे शहरात अट्टल घरफोडी चोराकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
पुणे (संदीप कद्रे): रेकॉर्ड वरील अट्टल घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराकडून ६,३०,७५० रु किमंतीचे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा, युनिट २ला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील रॉबरी, घरफोडी चोरी, चैन स्नॅचींग तसेच पाहीजे/फरारी, तडीपार आरोपीचा शोध घेवुन रेकॉर्ड वरील गुन्हेगार चेकींग […]
अधिक वाचा...एकतर्फी प्रेमातून आत्महत्या; विसरु शकत नाही, तिने केवळ वापर केला…
कोल्हापूर : एकतर्फी प्रेमातून विठ्ठल रोंगाप्पा जाधव (वय 21, रा. मलगड) या युवकाने आत्महत्या केली आहे. विठ्ठलचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. या घटनेची माहिती संबंधित मुलीच्या वडिलांना मिळाल्यानंतर त्यांनी निर्भया पथकाच्या माध्यमातून त्याचे समुपदेशन केले होते. यानंतर नैराश्यात गेलेल्या विठ्ठलने काजूच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याबाबात चंदगड पोलिसांनी नोंद केली आहे. विठ्ठल जाधव […]
अधिक वाचा...
