पुणे शहरातील विजय ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून…

पुणे : सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा, हॉटेल व्यावसायिक आणि अनेक नेत्यांच्या ओळखी असलेल्या विजय ढुमे यांची बांधकामाच्या लोखंडी सळई आणि भरीव लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून हत्या करण्यात आली होती. ढूमे यांचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडून विजयचा हॉटेलच्या पार्किंगमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने हल्ला करण्यात आला होता.

या प्रकरणी सुजाता समीर ढमाल (रा. किरकिटवाडी, नांदोशी रोड, पुणे), संदीप दशरथ तुपे (वय 27, रा. मु.पो. कांदलगाव, ता. इंदापुर, जि. पुणे), सागर संजय तुपसुंदर, प्रथमेश रामदास खंदारे (वय 18, रा. आंबेकर हॉटेल जवळ, उंड्री-पिसोळी, पुणे) आणि एका अल्पवयीन साथीदारास सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. विजय ढुमे याचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता ढमाल हिच्याकडेदेखील तपास केला होता. त्यावेळी सुजाताच्या नव्या प्रियकराने त्याच्या साथीदारांना सोबत घेत विजय ढुमेची हत्या केल्याचे समोर आले आहे.

सिंहगड क्वॉलिटी लॉजमधून खाली उतरल्यानंतर बाहेर पडत असताना चार ते पाच हल्लेखोरांनी विजय ढुमे यांच्यावर अचानकपणे हल्ला केला होता. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या घटनेमुळे सध्या पुणे शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. पण, सिंहगड रोड पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याचा शोध लावला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहीले की…

पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…

पुणे हादरलं! कुटुंबातील अगदी जवळच्या व्यक्तीकडून मुलगी गर्भवती…

पुणे शहरात बहिणीला त्रास देणाऱ्या दाजीची हत्या करून मेव्हण्याची आत्महत्या…

पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

पुणे शहरातील युवकाचा खून अनैतिक संबंधातून; आरोपीला अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!