हिंजवडीत दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटे ट्रकचे चाक…

पुणे : पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीत ट्रकने दुचाकीस्वाराला मागून धडक दिल्यानंतर ट्रकचे मागील चाक दुचाकीस्वाराच्या शरीरावर तब्बल दहा मिनिटं होते. कंबरेखालील शरीराचा भाग चाकाखाली चिरडला गेला. हे पाहून ट्रक चालक फरार झाला तर दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. रामदास वडजे असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या आहेत. हिंजवडीच्या लक्ष्मी चौकाजवळ बुधवारी (ता. 23) सकाळी साडे सातच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मी चौकाजवळ राहणारा रामदास वडजे हे दुचाकीवरुन कामाला निघाले होते. पाठीमागून लोडेड ट्रक भरधाव वेगात आला आणि लक्ष्मी चौकापुढील विठ्ठल लॉन्ससमोर रामदास यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक बसली. ट्रक इतक्या वेगात होता की चालक त्यावर नियंत्रण मिळवू शकला नाही. शेवटी ट्रकच्या मागील दोन्ही चाके रामदास यांच्या शरीरावर होती, कंबरेखालील भाग तर अक्षरशः चिरडला गेला.

रामदास वडजे गंभीर जखमी झालेले असतानाही मदतीची याचना करत होते. परंतु, ट्रक चालकाने मात्र रामदासला तशाच अवस्थेत सोडून तिथून पळ काढला. यावेळी अनेकांनी रामदास यांना मदत करण्याऐवजी मोबाईलमध्ये त्यांच्या वेदना कैद केल्या. अखेर, एका बस चालकाने संवेदनशीलता दाखवली, बस बाजूला घेतली आणि चालकाच्या सोबतीला बसमधील इतरांनी ही प्रसंगावधान दाखवले. या सर्वांनी ट्रकला धक्का दिला अन् तब्बल दहा मिनिटांनी रामदास वडजे यांची ट्रकच्या चाकाखालून सुटका झाली.

दरम्या,न काही वेळात पोलिस घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील रामदास यांना तातडीने रुग्णालयात हलवले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. गंभीर जखमी झालेल्या रामदास वडजे यांनी जीव सोडला होता. त्यानंतर हिंजवडी पोलिसांनी फरार ट्रक चालक रंगनाथ तांबे याला बेड्या ठोकल्या आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!