पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…

पुणे (संदीप कद्रे): विमानतळ पालिस स्टेशन हद्दीमधील प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) व त्याच्या ०२ साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष आहे. त्यांच्या मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५२वी कारवाई आहे.

विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे ०९/०८/२०२३ रोजी गु.र.नं. ४२४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३५२,४२७,५०४,५०६,३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील तीन आरोपी यांनी फिर्यादी यांना कोणाच्या सांगण्यावरुन ‘तु येथे हातगाडी लावतो, तुझी हातगाडी लगेच बंद करुन घे, नाहीतर तुला दाखवतो. मी कोण आहे, तु येथे कसा धंदा करतो तेच बघतो’, असे म्हणून शिवीगाळ करुन फिर्यादी यांना गाडीवर बस व आमच्या सोबत चल, तुला आम्ही कोण आहे ते दाखवितो अशी धमकी देवुन, जबरदस्तीने फिर्यादी यांचे गल्ल्यातील रोख ३०००/- रुपये घेवून गेले होते. त्याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचे तपासा दरम्यान आरोपी
१ ) प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड, वय २५ वर्ष रा.महादेवनगर,वडगाव- शेरी, पुणे (टोळी प्रमुख)
२) अरबाज अयुब पटेल, वय २४ वर्षे, रा. सर्वे नं. १९१, बुध्द विहारजवळ, नागपुर चाळ, येरवडा, पुणे
३) बबलु संतोष चव्हाण, वय २२ वर्षे, रा. ए. के. रेसिडन्सी, एस. ५,संजय पार्क, विमाननगर, पुणे (टोळी सदस्य) यांनी केला असल्याचे निष्पन्न झाल्याने अ. क्र. १ व २ यांना गुन्ह्याचे कामी अटक करण्यात आले आहे. आरोपींचे पुर्व रेकॉर्डची पाहणी करता, आरोपी प्रसाद उर्फ चिक्या संपत गायकवाड (टोळी प्रमुख) याचे विरुध्द एकुण ०८ गुन्हे दाखल आहेत.

आरोपी अरबाज अयुब पटेल याच्याविरुध्द ०६ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी बबलु संतोष चव्हाण याचेविरुध्द ०४ गुन्हे दाखल आहेत. वरील तीनही आरोपी यांनी एकत्रितरित्या गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झालेले आहे. यातील टोळीप्रमुख आरोपी याने त्याचे साथीदारासह स्वतःचे गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व व दहशत प्रस्थापित ठेवण्यासाठी, संघटित गुन्हेगारी संघटनेचा प्रमुख म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे, गंभीर दुखापत, जबरीचोरी, दरोडा, सार्वजनिक मालमत्तचे नुकसान, बेकायदेशीर जमाव जमविणे, घातक शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करुन सर्वसामान्य जनते मध्ये दहशत निर्माण केली आहे. यातील नमुद आरोपी यांनी विरुध्द वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करुन देखील त्यांनी पुन्हा गुन्हे केलेले आहेत.

दाखल गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii).३(२), ३(४) प्रमाणे चा अंतर्भाव करणेसाठी वरीष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर विलास सोंडे यांनी पोलिस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर शशिकांत बोराटे यांचे मार्फतीने अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पणे शहर रंजन कुमार शर्मा यांना प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रकरणाची छाननी करुन विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर येथे गु.र.नं.४२४ / २०२३ भा.दं.वि.कलम ३९२,३५२, ४२७,५०४,५०६, ३४ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३(४), प्रमाणे चा अंतर्भाव करण्याची अपर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिलेली आहे. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर संजय पाटील हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त पुणे शहर संदिप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रंजन कुमार शर्मा, पोलिस उप आयुक्त परीमंडळ ०४ पुणे शहर शशिकांत बोराटे, सहा. पोलिस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे शहर संजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विमानतळ पोलिस स्टेशन, पुणे शहर विलास सोंडे, पोलिस निरीक्षक गुन्हे संगीता माळी, सहा. पोलिस निरीक्षक मिलींद पाठक, सर्व्हेलन्स पथकातील पोलिस उप निरीक्षक एस. एस. कोळ्ळुरे व पोलिस हवालदार उमेश धेंडे, म.पो. अमंलदार भोर, शिंदे यांनी केली आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवुन, शरिरा विरुध्द व मालमत्ते विरुध्द गुन्हे करणारे व नागरीकां मध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मकोका अंतर्गत केलेली ही ५२ वी कारवाई आहे.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची मोक्का अंतर्गत १२वी कारवाई…

पुणे शहरातील ३५ गुन्हेगारांना केले हद्दपार…

पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!