माता न तू वैरिणी! मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल…

आईने झोपेत असलेल्या मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून दिले पेटवून

छ. संभाजीनगर: एका आईनेच आपल्याच पोटच्या मुलीला झोपेतच जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शहरातील फुलेनगरमध्ये घडली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

जादुटोण्याच्या दावा करणाऱ्या मैत्रिणीने मुलीला जाळल्यास धनलाभ होईल, असे सांगितल्यानंतर आईने हे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासादरम्यान उघड झाले आहे. जखमी अवस्थेत असलेल्या सुप्रिया दादासाहेब हुलमुख (वय 20) या मुलीने घरातून पळ काढत पोलीस ठाणे गाठले आणि त्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. पार्वती दादासाहेब हुलमुख (वय 40, रा. गल्ली क्र. फुलेनगर, आंबेडकरनगर) असे आरोपी महिलेच नाव आहे. पार्वतीला मुलीला पेटवून देण्याचं सांगणारी शंकुतला आहेर (रा. मिसरवाडी) वर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुप्रिया हुलमुख हिच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले असल्याने ती आपल्या आई व भावासह फुलेनगरमध्ये राहते. शिक्षणासोबतच ती एका खासगी कंपनीत कंत्राटी म्हणून काम करते. 17 ऑगस्ट रोजी दिवसभर कंपनीत काम करून ती घरी परतली. घरी आल्यावर जेवण करून सुप्रिया नेहमीप्रमाणे रात्री झोपी गेली. मात्र, पहाटे साडेचार वाजता तिला चटक्यांची जाणीव झाल्याने ती खडबडून जागी झाली. तेव्हा तिचे पांघरुण जळत होते. तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिची आईच तिला पेटवण्याचा प्रयत्न करीत होती. तिची आरडाओरड ऐकून भावाने तिच्या दिशेने तत्काळ धाव घेतली आणि तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. पण, यामध्ये सुप्रिया गंभीर जखमी झाली आहे.

‘तू जर मुलीला जिवंत जाळून मारलेस, तर तुला धनलाभ होईल. तसेच तुझ्या मुलाचे चांगले होईल,’ असे शकुंतला आहेर हिने पार्वतीला सांगितले होते. त्यामुळे जादुटोण्याच्या आहारी गेलेल्या पार्वतीने आपल्याच मुलीला झोपेत असतानाच पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सुप्रियाचे केस, खांद्यासह शरीरावर आगीमुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. सुदैवाने त्यात ती वाचली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…

आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

धक्कादायक! भाऊजीची अन् मेहुण्याची एकाच दिवशी आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!