
घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर-जळगाव रोडवर स्थिर पथकाने गुरुवारी (ता. 15) सायंकाळी सिल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने ताब्यात घेतले आहेत.
संभाजीनगर जळगाव रोडवरील निल्लोड फाट्यावर असलेल्या चेकपोस्टवर संभाजीनगरकडून जळगावकडे जाणाऱ्या वाहनाची तपासणी केली होती. यावेळी 19 कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने सापडले. हे दागिने जळगाव येथील एका ज्वेलर्सचे असल्याची माहिती पुढे आली आहे. सदर सापडलेलं हे सोनं-चांदी जीएसटी विभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. दागिने खरेदी आणि विक्रीच्या व्यवहारांची माहिती घेण्यासाठी संबंधितांना बोलवण्यात आले आहे. तसेच याबाबतच्या सर्व कागदपत्रांचीही पडताळणी केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
दुसऱ्या घटनेत अमरावतीत पोलिसांनी 5 कोटी रुपयाचं सोने-चांदी घेऊन जाणारे वाहन जप्त केले आहे. यासंबंधित नागपुरी गेट पोलिस पुढील तपास करत आहेत. येवल्यात देखील निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे. एटीएम वाहनातून 41 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. पैशांची पावती व प्रत्यक्ष रक्कमेत 10 लाखांची तफावत आढळल्याने कारवाई केली. दुसऱ्या एका कारवाईमध्ये 1 लाख 92 हजार 880 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. बँकेतून रोकड घेवून जात असतांना करण्यात आली ही कारवाई केली गेली. पैसे कोणाचे व कुठे जात होते याचा पोलिस शोध घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील मतदारसंघात फॉर्च्युनर गाडीमधील रोकड जप्त…
मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…
पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…
पुण्यात 138 कोटी रुपये किमतीचे सोनं आलं कुठून? महत्त्वाची माहिती…
पोलिसांची मोठी कारवाई; 4,00,00,000 ही रक्कम कोणाची…

