निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर छापा टाकला अन् मिळालं मोठं घबाड…

भोपाळ (मध्य प्रदेश): एका निवृत्त कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापेमारी केली असता, त्याच्या घरात मोठं घबाड सापडले आहे. या कारवाईत कोट्यवधींची रोख रक्कम, मोठ्या प्रमाणात सोनं, चांदीचे दागिने आणि नोटा मोजण्याची सात मशीन मिळाली आहेत. एका निवृत्त कॉन्स्टेबलकडे एवढं मोठं घबाड सापडल्याने खळबळ उडाली आहे.

भोपाळमध्ये एका निवृत्त आरटीओ कॉन्स्टेबलच्या घरावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत त्याच्या घरात कोट्यवधींची रोकड आणि मोठ्या प्रमाणावर सोनं, चांदीचे दागिने सापडले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत आयकर विभागाच्या पथकाला सौरभ शर्माकडे 2.85 कोटी रुपये रोख, 60 किलो चांदी, 50 लाख रुपयांचे सोनं, हिऱ्याचे दागिने, 4 एसयूव्ही, अनेक मालमत्तांची कागदपत्रं आणि नोटा मोजण्याची 7 मशीन सापडली आहेत.

परिवहन विभागातील निवृत्त कॉन्स्टेबल सौरभ शर्मा याच्या विरोधात उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता जमा केल्याची तक्रार होती. या तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी गुरुवारी सकाळी भोपाळमधील ई-7 अरेरा कॉलनीतील त्याच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला. सौरभ शर्मा याने सात वर्ष नोकरी केल्यानंतर व्हीआरएस घेतली होती. तपासादरम्यान, घरी आणि कार्यालयात अनेक मालमत्तांची कागदपत्रं सापडली आहेत.

सौरभच्या घरी चार लग्झरी गाड्या सापडल्या आहे. यात फोर्स कंपनीच्या एका व्हॅनचा देखील समावेश आहे. गाड्यांची झडती घेतली असता व्हॅनमध्ये एक बॅग सापडली. त्यात पथकाला 82 लाख रुपयांची रोकड सापडली. याशिवाय पथकाला घरातील कपाटांमधून 1.15 कोटी रूपये आणि कार्यालयात 1.70 कोटी रुपयांची रोकड सापडली. तसेच 50 लाख रुपयांचे सोनं, हिऱ्याचे दागिने आणि कार्यालयात 60 किलो चांदीच्या अंगठ्या सापडल्या आहेत.

दरम्यान, सौरभचे वडील आर.के. शर्मा हे सरकारी डॉक्टर होते. 2015 मध्ये त्यांच्या निधनानंतर सौरभला परिवहन विभागात अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळाली. सात वर्ष नोकरी केल्यावर त्याने व्हीआरएस घेतली आणि मग तो बांधकाम क्षेत्रात उतरला आहे.

मोठं घबाड! जंगलात कारचा दरवाजा उघडला अन् सोनं, पैसे पाहून पोलिसही चक्रावले…

भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…

क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्याच्या घरात मोठं घबाड; दागिने अन् नोटांची थप्पी…

घबाड सापडलं! चेकपोस्टवर 190000000 रुपयांची सोनं-चांदी जप्त…

नाशिकमध्ये सराफाच्या घरात फर्निचर फोडताच मिळालं भलं मोठं घबाड….

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!