आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला बापाने उचलले अन्…

भंडारा : आईच्या मांडीवर खेळत असलेल्या चिमुकल्याला (वय ३) मद्यपी बापाने ओढत नेत त्याला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. भंडारा जिल्ह्यातील विरली (ता. लाखांदूर) या गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. याप्रकरणी लाखांदूर पोलिसांनी आरोपी राजेंद्र गायधने याला अटक केली आहे. राजेंद्र गायधने याला दारूचे व्यसन आहे. घरी नेहमी प्रमाणे तो दारू पिवून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! ट्रकच्या धडकेत चिमुकलीसह माता-पित्याचा जागीच मृत्यू…

चंद्रपूर: ट्रकने एका मोटरसायकलला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघातात अन्य दोन जण जखमी झाले आहेत. राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही अपघाताची घटना घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. निलेश वैद्य (वय 32) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (वय 26 ) आणि मुलगी मधू वैद्य (वय […]

अधिक वाचा...

इन्स्टाग्रामवर मैत्री झालेली युवती निघाली तृतीयपंथी अन् पुढे…

पाटणा (बिहार): सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेल्या इन्स्टाग्रावर मैत्री झालेली युवती तृतीयपंथी निघाली. पण, युवकाने मोठे धाडस दाखवत विवाह केला. कुटुंबियांनी दोघांना मारहाण केल्यानंतर त्यांच्या विरोधात युवकाने गुन्हा दाखल केला आहे. रवि कुमार यांची इन्स्टाग्रामवरून आधिका चौधरी सिंह सोबत मैत्री झाली होती. दोन वर्षे दोघे एकमेकांशी बोलत होते. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे मैत्रीण तृतीयपंथी असल्याचे […]

अधिक वाचा...

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

नागपूर: भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचे गुढ उलगडले आहे. प्रमुख संशयित आरोपी अमित साहू याला नागपूर पोलिसांनी जबलपूरमधून अटक करून नागपुरात आणले आहे. अमित साहू हा सना खान यांचा पती असून त्याने सना खान यांची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. अमित साहू याने सना खान यांचा खून केल्यानंतर मृतदेह हिरण नदीत फेकल्याची माहिती […]

अधिक वाचा...

I-Phone, I-Pad, Smart Watch चोरणाऱ्यांना युनिट -2 ने केले जेरबंद…

पुणे (संदीप कद्रे): ब्लू डार्ट कंपनीच्या गाडीतून महागडे मोबाईल चोरणाऱ्या आरोपींना युनिट -2 ने 24 तासात जेरबंद केले असून, 3,90,445 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिनांक 10/08/2023 रोजी रात्री सहकारनगर पोलिस स्टेशन गु र. क्र.193/2023 भादवि कलम 379 अन्वय ब्लू डार्ट एक्सप्रेस कुरिअर कंपनीचे मालवाहतुकी दरम्यान APPLE कंपनीचे I-PHONE, I-PAD […]

अधिक वाचा...

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांकडे दोन मोबाइल, दोन बॅटऱ्या आणि एक सिमकार्ड सापडले आहे. याबाबत तुरुंगाधिकारी रेवनाथ कडू कानडे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी न्यायबंदी तालीम मोहम्मद खान, राजु तुकाराम अस्वले, सचिन उर्फ पप्पू दत्तात्रय घोलप व आकाश उत्तम रणदिवे यांच्याविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात कारागृह कायदा 1894 नियम 42, 45 (12) आयपीसी […]

अधिक वाचा...

धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…

धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक […]

अधिक वाचा...

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

नागपूर : भाजप पदाधिकारी सना खान या गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  मानकापूर पोलिस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जबलपूर पोलिस प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याने नागपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास पथक जबलपूरला रवाना केले आहे. जबलपूर येथील […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…

पुणे: आयटी अभियंता सौरभ नंदलाल पाटील (वय 23) हत्या प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्ट रोजी सौरभचा मृतदेह आढळला होता. सौरभ हा 28 […]

अधिक वाचा...

नाशिकमध्ये टोळक्याने केलेल्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू…

नाशिक: नाशिक शहरातील अंबड लिंक रोडवर दहा ते बारा जणांनी धारदार शस्त्राने दोन युवकांवर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मेराज खान (वय 18), इब्राईम शेख (वय २३) असे मृत्युमुखी पडलेल्या दोघांची नावे आहेत. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही हत्या झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी (ता. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!