नागपूर! प्रेयसीचा OYO हॉटेलमध्ये गळा चिरून हत्या…

नागपूर : नागपूरच्या फेटरी परिसरात असलेल्या एका OYO हॉटेलमध्ये प्रेयसीचा गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे नागपूरसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

रुचिता भांगे (वय 22) असे मृत युवतीचे नाव आहे. आरोपी प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुचिता आणि सौरव हे सायंकाळच्या सुमारास नागपूर ग्रामीण हद्दीतील फेटरी परिसरातील एका OYO हॉटेलमध्ये गेले होते. दोघांमध्ये काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. घटनेच्या रात्री हॉटेलच्या खोलीत दोघांमध्ये भांडण झाल्याचा संशय आहे. याच वादातून सौरवने रात्री उशिरा किंवा पहाटेच्या सुमारास रुचिता हिच्यावर चाकूने हल्ला करत तिचा गळा कापून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. हल्ल्यानंतर आरोपी सौरवने हॉटेलमधून पळ काढला आहे.

Police-Book

हॉटेल कर्मचाऱ्यांना सकाळी सुमारे 9.30 वाजता खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला. दरवाजा उघडल्यानंतर खोलीत रक्ताच्या थारोळ्यात रुचिता मृतावस्थेत आढळून आली, याची माहिती तात्काळ नागपूर ग्रामीण पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आरोपी सौरव जामगडे याच्या शोधासाठी नागपूर ग्रामीण पोलिसांनी विशेष पथके तयार केली असून, संभाव्य ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. आरोपीचा मोबाईल फोन, सीसीटीव्ही फुटेज तसेच हॉटेलमधील नोंदींच्या आधारे तपास वेगाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, प्रेमसंबंधातून घडलेल्या या निर्घृण हत्येने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

नांदेड! युवकाच्या हत्या प्रकरणातील प्रेयसीचा धक्कादायक खुलासा…

पुणे! विवाहित प्रेयसीला गावी फिरायला जाऊ म्हणून कारमध्ये बसवले अन्…

पुणे! प्रेयसीचा वाढदिवस लॉजवर साजरा केला अन् केली निर्घृण हत्या…

बुलढाण्यात हॉटेलमध्ये प्रियकराने केला प्रेयसीवर हल्ला; दोघांचाही मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!