शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीकडून चार मोटारसायकली केल्या जप्त…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरात मौजमजेसाठी मोटारसायकल चोरी करणा-या आरोपीकडून ४ मोटारसायकली जप्त करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

फिर्यादी रामदास सुरेश कोकणे (वय ३४ वर्षे, धंदा-नोकरी, रा. रॉयल एम्पायर बिल्डींग, फलॅट नं. ४०६, सिंहगड कॉलेजसमोर, बॅक ऑफ महाराष्ट्रजवळ, न-हे, पुणे. ४१) यांची खुडे ब्रिजवर शिवाजीनगर पुणे येथे पार्क करुन ठेवलेली ८०,००० रु.कि.ची पांढरे रंगाची होंडा अॅक्टीव्हा क्र. एम.एच.१४, ई.डब्ल्यु.९३३२ ही कोणीतरी अज्ञाताने चोरी केली होती. याबाबत तक्रार दिल्याने नमुदचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयांना प्रतिबंध करण्यासाठी व घडलेल्या गुन्हयाची उकल करण्याचे अनुषंघाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने दिलेल्या सुचनानुसार सपोनि नाईक व पथक वाहन चोरांची व चोरीस गेलेल्या वाहनांची माहिती संकलीत करुन तांत्रीक तपासाच्या आधारे व पो.ह. वाघमारे व साठे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार हेमंत बाजीराव लगड (वय ५२ वर्षे, रा. ११९७ रामनारायण बंगला, एफ. सी. रोड, शिवाजीनगर, पुणे) यास डेक्कन परिसरातून सपोनि बाजीराव नाईक, पो.ह. वाघमारे, अतुल साठे, प्रविण राजपुत ताब्यात घेवून सखोल तपास करून ०८/१२/२०२३ रोजी अटक करुन कसुन तपास केला. त्याने व त्याचा मिञ परदेशी ऊर्फ चिकन्या (वय २५ वर्षे, रा. पत्ता माहीत नाही) यांनी आणखी मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे सांगितल्याने पंचनाम्याअंतर्गत खालीलप्रमाणे चोरी केलेल्या मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.
1) ८०,०००/-र. कि.ची MH 14 EW 9332 होंडा अॅक्टीव्हा पांढरे रंगाची
2) ३०,०००/- र. कि.ची MH 12 MK 3013 होंडा शाईन काळया रंगाची
3) १,२०,०००/- र.कि.ची MH 12 FN 6936 बजाज पल्सर काळया रंगाची
4) ८०,०००/- र. कि.ची MH 12FL 6094 सुझुकी अक्सेस काळया रंगाची
एकुण-३,१०,०००/- रु. कि. च्या ४ मोटार सायकल उघडकीस आलेले गुन्हे खालीलप्रमाणे:-
१) शिवाजीनगर पोलिस स्टेशन गु.र.क्र. २४५/२०२३ भादवि कलम ३७९,३४
२) शिवाजीनगर पोलिस स्टेशन गु.र.क्र. २२३ / २०२३ भादवि कलम ३७९,३४
३) बंडगार्डन पोलिस स्टेशन गु.र.क्र.३७५/२०२३ भादवि कलम ३७९ सुझुकी अक्सेस काळ्या रंगाची मोटारसायकल संदर्भात त्याचे मालकाचा शोध घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. तसेच पाहीजे आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.

सदरची कामगिरी प्रविण पाटील, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, संदीप सिंह गिल्ल, पोलिस उपआयुक्त परिमंडळ १ व वसंत कुवर सपोआ विश्रामबाग विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वपोनि अरविंद माने, पोनि (गुन्हे) विक्रम गौड, सपोनि बाजीराव नाईक, पो.ह. रुपेश वाघमारे, पो.ह. अतुल साठे, पो.ह. वालकोळी, प्रविण राजपुत, पो.ना. खुरंगे, पो. शि. तुकाराम म्हसके, शरद राउत मपोशि. रुचिका जमदाडे यांनी केली आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाणेकडील गुन्हेगारावार एमपीडीए अंतर्गत कारवाई…

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पुणे शहरातील प्रसिद्ध हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न; शिवाय…

रुबी हॉल रुग्णालयातील महिला कर्मचाऱयाची आत्महत्या; एचआर हेडसह दोघांविरुद्ध गुन्हा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!