पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव कोंबळे याला हजर केले असता, सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जसा पोलिसांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्ले करून तो झूम केल्यानंतर हो, व्हिडिओमध्ये दिसणारा तो माणूस मीच आहे…” अशी कबुली दिली.

न्यायालयाने आरोपी भीमराव कोंबळे याला सीसीटीव्हीमध्ये लहान मुलगी घटनास्थळाकडे तुझ्यासोबत जाताना दिसतेय आणि काही वेळाने तू एकटाच परतताना दिसतोयस, अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने ‘तो मी नाही’ असा कांगावा केला. परंतु, व्हिडिओ झूम करून दाखवताच त्याने मान्य केले. स्वतःचा बचाव करताना आरोपी न्यायालयात म्हणाला, “घटनेच्या दिवशी मी शेतात गेलो होतो, तिथे ती मुलगी आली. तिला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला आणि आम्ही पडलो. त्यामुळे मुलीच्या डोक्याला मार लागला आणि ती मोठ्याने रडू लागली. ती रडत असल्याने मी तिला खाटेवर झोपवले. मात्र, तिच्या रडण्याचा आवाज ऐकून लोक जमा होतील आणि माझ्यावरच आरोप करतील, या भीतीने मी तिला तिथेच सोडून कट्ट्यावर जाऊन बसलो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात भक्कम पुरावे सादर केले आहेत. मृत चिमुकलीच्या शरीरावर आरोपीने घेतलेले चावे आणि त्याचे केस आढळून आले आहेत. त्याला प्रयोगशाळेच्या ‘डीएनए’ अहवालाने स्पष्ट दुजोरा दिला आहे. आरोपीने पीडितेचे तोंड दाबण्यासाठी जो कपडा वापरला होता, त्यावरही आरोपीचाच डीएनए सापडला आहे. यावरून आरोपीने अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने हा गुन्हा केल्याचा दावा सरकारी पक्षाने केला आहे.

नसरापूरच्या या संवेदनशील प्रकरणात पुणे पोलिसांनी आणि न्यायव्यवस्थेने कमालीची तत्परता दाखवली आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून अवघ्या १६ दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतरच्या अवघ्या १६ दिवसांत तब्बल ५५ साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. न्यायालयासमोर तब्बल ३५५ पेक्षा जास्त कागदोपत्री पुरावे सादर करण्यात आले आहेत.

दरम्यान, या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली असून, आज (शनिवारी) सरकारी पक्ष आणि बचाव पक्षातर्फे न्यायालयात अंतिम युक्तिवाद केला जाणार आहे. चिमुकलीला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी विशेष सरकारी वकील अजय मिसर, सहाय्यक ॲड. सुरेश गायकवाड, ॲड. प्रथमेश शिंगणे व्हीसीद्वारे, तर तपास अधिकारी विजयमाला पवार व वरिष्ठ पोलिस अधिकारी राजेंद्र मायने न्यायालयात उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…

पुणे! नसरापूर प्रकरणातला सगळ्यात मोठा पुरावा सीसीटीव्हीत कैद…

नसरापूर प्रकरण! CCTV फुटेजमुळे वाढलं गुढ; गाठोड्यात नेमकं काय…

पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…

संतापाची लाट! नसरापुरातील आरोपीने कोंबड्या, बकऱ्यांनाही सोडले नाही…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!