युवकाच्या हत्येचं खरं कारण आलं समोर; समलैंगिकांनी काढला काटा…

अहिल्यानगर : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे एका माऊली गव्हाणे (वय १८) या युवकाची हत्या झाली आहे. पोलिसांनी गुन्हा उघड केला आहे. समलैगिंक संबधांतून ही या हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपींनी माऊलीचे दोन्ही हात, पाय अन् मुंडके छाटले. तसेच शीर, हात, पाय हे कटरने कापून त्यानंतर त्याचे धड एका पोत्यात भरले. हे दोन्ही गाठोडे त्यामध्ये मोठे दगड भरून दानेवाडी नदीच्या बाजूला असणाऱ्या विहिरींमध्ये टाकून दिले होते. या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. समलैगिंक संबधांतून ही या हत्या झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी कसून तपास केला. दाणेवाडी गावातीलच सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. एक अल्पवयीन आरोपीसुद्धा या हत्याकांडात सहभागी असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.

तपासादरम्यान समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संशयित आरोपी सागर दादाभाऊ गव्हाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते. या गोष्टीची माहिती माऊली गव्हाणे याला होती. त्यामुळे रागाच्या भरात त्याला संपवण्याचा कट आखण्यात आला आहे. क्रूर हत्येच्या या घटनेने शिरूर, श्रीगोंदा, अहिल्यानगर हादरला आहे. अहिल्यानगर पोलिस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलिस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी दिला होता. खून करणारे आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता. समलैगिंक संबधांची माऊली वाच्यता करेल आणि आपली बदनामी होईल या भीतीने जोडप्याने माऊलीची हत्या केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सदर कारवाई राकेश ओला, पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर, प्रशांत खैरे, अपर पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत उपविभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

बीड! प्रेमसंबंधातून युवकाला बेदम मारहाण करत जागेवरचं संपवलं…

बीड! शिक्षकानं हृदयद्रावक पोस्ट लिहून संपवलं आयुष्य; मुंडेंनी खूप छळ केला…

सहा विद्यार्थ्यांचा महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; व्हिडिओ बनवला अन्…

नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून…

सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…

डोळा मारणं आणि फ्लाईंग किस देणेही लैंगिक छळच…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!