पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

पुणे (संदिप कद्रे): हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव पुणे पोलिसांनी उघड केला आहे. पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला होता. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री घेतली होती. पण, पोलिसांनी तपास करून खोटा बनाव उघड केला आहे.

सदरबाबत अधिक माहिती अशी की, तिथल जितेंद्र शहा (वय-३५ वर्षे व्यवसाय- डायमंड ज्वेलरी मेकींग रा. मुद्रा सोसायटी फ्लॅट नं १५०२ ए विंग बिबवेवाडी पुणे) याचे अपहरण करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागणी बाबत त्यांची पत्नी हितांशी शहा यांचे मोबाईलवर ०३/०३/२०२५ रोजी १७.५९ वा कॉल प्राप्त झाला होता. यावरुन हितांशी तिथल शहा यांनी सदर बाबत तक्रार दिल्याने बिबवेवाडी पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. ४९/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १४०(२) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हाचे अनुषंगाने पोलिस उपआयुक्त परिमंडळ -५ पुणे शहर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली बिबवेवाडी पोलिस स्टेशन व गुन्हे शाखा, पुणे शहर हे सदर अपहृत व्यक्तीचा शोध घेत होते. सदर अपहृत व्यक्तीचा तांत्रीक तपास करुन सदरचा अपहृत व्यक्ती नवले ब्रिज, रावेत, खोपोली व नवी मुंबई भागात गेला असल्याचे तांत्रीक तपासात निष्पन्न केले. अपहृत व्यक्ती अतिशय हुशारीने व चालाखीने ओळख लपवून कोणताही तांत्रीक पुरावा पोलिसांना मिळणार नाही याची काळजी घेत होता, तो कोठेही ऑनलाईन व्यवहार न करता सोशल मिडीयातील काही अॅपच्या माध्यमातून त्याचे जवळच्या लोकांचे संपर्कात राहत होता.

पुणे पोलिसांनी तपास करुन, त्याचा बनाव उघड केला. तो मिळून येताच त्याचेकडे केले प्राथमीक चौकशी मध्ये त्याने सांगीतले की, पुण्यातील दहा ते बारा लोकांकडून त्याने पैसे घेतले होते. ते पैसे देणे न झाल्याने त्याने ०३/०३/२०२५ रोजी सायंकाळी १७.५९ वा त्याची पत्नी हितांशी शहा यांना स्वतःचे मोबाईल वरून अपहरण झाले असलेबाबत स्वतःच वेगळा आवाज काढून पत्नीस खोटा कॉल केला. त्यांनतर नवले ब्रिज वरून स्वतःचा फोन बंद करून तो गायब झाला, त्यानंतर तो नवले ब्रिज येथून रिक्षाने रावेत येथे व रावेत येथून प्रायव्हेट गाडीने कळंबोली मुंबई येथे गेला. तिथून बॉम्बे सेंट्रल इथे एक दिवस लॉजवर, खार वेस्ट मुंबई येथे लॉजवर दोन दिवस, व एक दिवस विलेपार्ले येथे राहिला. त्याला इतरांचे पैसे देणे जमत नसल्याने त्याने हा बनाव केला असल्याचे त्याने सांगीतले. त्याने केलेला बनाव हा अतिशय चालाखीने केला असून कुठेही तांत्रीक पुरावा उपलब्ध होणार नाही तसेच ऑनलाईन ट्रांजेक्शन होणार नाही याची पूर्ण खात्री त्यांनी घेतली होती.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, परिमंडळ ५ पुणे शहर, पोलिस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहा.पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे वानवडी विभाग पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त राजेंद्र मुळीक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा पुणे शहर व वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे, सहा पोलिस निरीक्षक विद्या सावंत, तपास पथक अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलिस उपनिरीक्षक विवेक सिसाळ, पोलिस उप निरीक्षक शशांक जाधव, पोलिस उपनिरीक्षक गणेश घुले,परि पोलिस उपनिरीक्षक अमोल भुवड, सहा.पोलिस फौजदार संतोष पाटील, पोलिस हवालदार संतोष जाधव, संजय गायकवाड, पोलिस अमंलदार सुमित ताकपेरे, दत्ता शेंद्रे, प्रतिक करंजे, नितीन धोत्रे, विशाल जाधव, ज्योतिष काळे, आशिष गायकवाड, शिवाजी येवले व प्रणय पाटील यांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…

पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…

Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…

अपहरण! मी तुझ्या पतीला उचललं असून, दोन कोटी तयार ठेवा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!