जालना जिल्ह्यात चारचाकी विहिरीत कोसळली; सात जणांचा मृत्यू…

जालना : जालना जिल्ह्यातील राजूर रोड वरील तुपेवाडी फाट्याजवळ काळी पिवळी जीप विहिरीत कोसळली असून, सात जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. गाडीत 12 प्रवासी असण्याची शक्यता आहे. तीन जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

जालन्यातून काही प्रवासी काळ्या-पिवळ्या जीपमधून राजूरच्या दिशेने जात होते. राजूरकडे जात असताना तुपेवाडी फाट्याजवळ हा अपघात झला आहे. गाडीचा ब्रेक फेल झाल्याने ही काळी-पिवळी जीप रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. या विहीरीला कठडे नसल्याने जीप थेट विहिरीत गेली. जीप कोसळल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ त्या दिशेने धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त गाडीतील अनेक प्रवासी पंढरपूर येथून वारी वरून आले होते. जालना येथून ते आपल्या गावाकडे जाण्यासाठी यामधून प्रवास करत होते. सात मृतदेह हाती लागले असून तीन जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. तिघांवरती जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

मृतांची नावे पुढीलप्रमाणे…
1 प्रल्हाद बिटले- रा चनेगाव ता. बदनापूर.
2 प्रल्हाद महाजन -रा चनेगाव
3 नारायण निहाळ -रा चनेगाव
4 नंदा तायडे -रा चनेगाव
5 रंजना कांबळे -रा खामखेडा ता भोकरदन .
6 ताराबाई भगवान मालुसरे -रा तपोवन ता भोकरदन .
7 चंद्रकला अंबादास घुगे –रा चनेगाव ता बदनापूर.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…

नाशिकमध्ये भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू; पाहा नावे…

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

भीषण अपघात! दुधाच्या कंटेनर आणि बसमध्ये धडक; 18 जणांचा जागीच मृत्यू…

दुचाकी आणि सेल्फीच्या नादात मृत्यू, अपघात कॅमेरात कैद, पाहा Video…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!