धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…

पुणे : कोल्हेवाडी, खडकवासला येथे भरदिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सतीश थोपटे (रा. कोल्हेवाडी, खडकवासला) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्यांच्यावर सपासप वार केले. यानंतर गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बुधवारी (ता. २७) सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

area-37

कोल्हेवाडी या गजबजलेल्या परिसरात भर दिवसा ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ला कोणी व का केला? याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून हल्ल्याची संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे गावचे माजी उपसरपंच आणि कंत्राटदार विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे.

पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…

Video: पुणे ग्रामीण पोलिसांनी स्मशानभुमी मधील लाकडावरुन उघड केला खुनाचा गुन्हा…

पुणे शहरात शरद पवार गटाचा नेत्यावर भरदुपारी हल्ला…

पुणे शहरात वर्गातच विद्यार्थ्याने चिरला काचेच्या तुकड्याने गळा…

पुणे जिल्ह्यातील घटना! चोराला पकडून दिले अन् जीव सोडला…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!