
भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…
पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर हत्या झाली होती. सतीश वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केला आहे.
सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने वैयक्तिक कारणातून ही हत्या केल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली. त्यासाठी आरोपीने इतर चार जणांना ५ लाख रुपयांची सुपारी दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये सुपारी देणाऱ्या व्यक्तीचा देखील समावेश आहे. हत्येच्या वेळी कारमध्ये असलेला एक आरोपी मात्र अद्याप फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले, ‘सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात एकूण पाच आरोपी आहेत. आतापर्यंत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. वैयक्तीक कारणातून घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीने सुपारी देऊन हत्या केली आहे. ज्याने सुपारी दिली त्यालाही अटक केली आहे. हत्येच्या वेळी गाडीत असलेला एक आरोपी फरार आहे, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या गाडीला ट्रेस करून हत्येचा उलगडा केला आहे.’
‘सतीश वाघ यांची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली? याची कोणतीही माहिती पोलिसांनी दिली नाही. मात्र ही घटना व्यक्तीगत कारणातून झाली आहे, असे अमितेश कुमार यांनी सांगितले. अपहरणानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत गाडीतच सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी हा तपास क्राईम ब्रँचकडे सोपावण्यात आला आहे. पाच पैकी चार आरोपींवर कोणताही गुन्हा दाखल नाही. एका आरोपीवर धुळे जिल्ह्यात एक गुन्हा दाखल आहे,’ अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…
आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी मारेकरी ताब्यात, हत्येचं गुढ…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या, मृतदेह सापडला…
पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे जिल्ह्यातील माजी उपसरपंचाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फेकले पाण्यात…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक

