हृदयद्रावक! माझ्या जिवलग मित्रांनो, माझी जाण्याची वेळ आली आहे…

सांगली: तासगाव तालुक्यातील मणेराजूरी गावामधील उच्चशिक्षित युवकाने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. ऋतुराज सुरेश पवार (वय ३२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. ८) दुपारी विष प्राशन करून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ऋतुराज याने सोमवारी दुपारी 4 वाजता गावातील एका व्हॉट्सॲप ग्रुपवर एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणाला होता की, “नमस्कार, मी ऋतुराज. मी बऱ्याच दिवसांपासून मानसिक तणावाखाली होतो. माझी स्वप्नं आणि महत्त्वाकांक्षा मोठ्या होत्या, पण त्या पूर्ण करण्याचं ओझं मी माझ्या आई-वडिलांवर टाकलं. ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली. माझी मानसिक स्थिती खालावत गेली आणि गोळ्यांच्या ओव्हरडोसमुळे मी यातून बाहेर पडू शकलेलो नाही. माझ्या वडिलांना वयाच्या 63 व्या वर्षीही 12 तास काम करावं लागतं, याला मीच जबाबदार आहे. मी मुलगा म्हणून लायक नाही. माझ्याकडे शेअर मार्केट, क्रिप्टो मार्केट, फ्रीलान्सिंग, इंजिनिअरिंग डिग्री, जागतिक अर्थव्यवस्था यांचं ज्ञान असूनही मी माझ्या आई-वडिलांना काही देऊ शकलो नाही. माझ्या जिवलग मित्रांनो, तुम्ही माझ्या या स्थितीतही साथ दिलीत, याबद्दल मी आभारी आहे. पण आता माझी जाण्याची वेळ आली आहे”, अशी पोस्ट ऋतुराजने लिहिली होती.

दरम्यान, संबंधित पोस्ट पाहिल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, गावाजवळच्या एका साठवण तलावाजवळ त्याचा मृतदेह आढळला. त्याने द्राक्ष बागेत वापरले जाणारे विषारी औषध प्राशन केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हृदयद्रावक! नवजात बाळाला रस्त्यावर फेकले; थंडीत गारठलं, कुत्र्याने लचके तोडले तरीही…

हृदयद्रावक! मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईचाही मृत्यू…

हृदयद्रावक! पत्नीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पतीचाही मृत्यू…

हृदयद्रावक! पोलिसकाकाच्या मुलीने भावनिक चिठ्ठी लिहून संपवलं जीवन…

हृदयद्रावक! बहिणीची वाट पाहात असताना रस्त्यावर पाहिला मिळाला मृतदेह…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!