
सांगलीत दुचाकी अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू…
सांगली : सांगली शहरातील कुमठेफाटा जवळ झालेल्या अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ओव्हरटेक करीत असताना वडापने दुचाकीला उडविल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातामध्ये दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा येथे ओव्हरटेक करीत असताना वडापने समोरून येणार्या दुचाकीला उडविल्याने आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. सबंधित महिलेचा पती मात्र गंभीर जखमी असून त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते. ते कुमठेफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणार्या वडापने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले आहेत. त्यामुळे या भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे.
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने तीन जणांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कु्र्ला बस अपघातातील बस चालक मोरेची पत्नी आणि मुलाने सांगितले की…
बारामतीजवळ मोटार अपघातात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू…
IPS अधिकाऱ्याचा पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना अपघाती मृत्यू…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू…

