पुणे शहरात मोबाईल व लॅपटॉप चोरणाऱ्या आंतरराजीय टोळीचा पर्दाफाश…

पुणे : स्वारगेट एस.टी.स्टॅन्ड व पुणे परिसरामध्ये मोबाईल व लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराजीय टोळीचा स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकाने पदार्फाश करुन एकुण १३ लाख रुपये किंमतीचे १२० मोबाईल व ०३ लॅपटॉप असा मुद्देमाल स्वारगेट पोलिसांनी जप्त केला आहे.

स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर हद्दीमधील स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवून त्यांचे मोबाईल चोरी करीत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. एका फिर्यादी यांचा मोबाईल चोरी झाल्याने स्वारगेट पोलिस स्टेशन गुन्हा रजि नं २४४ / २०२४ भादंवि कलम ३७९ दाखल करण्यात आला होता असल्याने सदर अज्ञात चोरटयाचा शोध घेणेबाबत मा. वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वारगेट पोलिस स्टेशन यांनी स्वारगेट पोलिस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते. त्यावरुन तात्काळ स्वारगेट पोलिस स्टेशन कडील तपास पथकाचे सहा. पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले व तपास पथकातील पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांनी स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तांत्रीक विश्लेषनाद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे वर्कआऊट करुन स्वारगेट एसटी स्टॅन्ड परीसरात वारंवार पेट्रोलिंग करीत होते.

पोलिस अंमलदार हर्षल शिंदे, फिरोज शेख व सुजय पवार यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक जण स्वारगेट एसटी स्टॅन्डमध्ये संशयितरित्या फिरत आहे. सदर बातमी वरिष्ठांना दिली असता वरिष्ठांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन तपास पथकातील वर नमुद अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन सापळा थांबले असता मिळालेल्या बातमीप्रमाणेच एकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सदर इसमास ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव इम्रान ताज शेख (वय ३१ वर्षे, धंदा- चालक, रा. असरफ नगर गल्ली नं. ०५ कोंढवा पुणे) असे सांगितले त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याचेवर संशय बळावल्याने त्यास स्वारगेट पोलिस स्टेशन येथे आणुन कसुन चौकशी केली असता त्याने स्वारगेट परिसरामध्ये १०० ते १५० मोबाईल चोरी केले असल्याचे सांगितले. त्यास दाखल गुन्हयात अटक करुन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर मोबाईल ऊसामा शफिक शेख (वय २२ वर्ष, धंदा व्यवसाय, रा. गल्ली नं.०५ सय्यदनगर, हडपसर पुणे) यास विक्री केले असल्याचे सांगितले.

policekaka-special-offer
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

आरोपी इम्रान शेख याचे पुर्वरेकॉर्ड तपासले असता त्याचेवर चोरीचे एकुण १० गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. तद्नंतर ऊसामा शेख याचा शोध घेवुन त्यास अटक केली असता त्याने सदर मोबाईल खरेदी करुन त्याचेवर सॉफ्टवेअर मारुन सदर मोबाईल पुढे मुंबई येथील एजंट आबिद मुकीम पटेल (वय २३ वर्षे धंदा शिक्षण रा. प्लॉट ५२, रुम नं.५७, गेट नं ०७. मालाड मालवणी मुंबई) व अख्तर अली रवियल खान (वय ३४ वर्षे धंदा व्यवसाय रा. रुम नं ११८ पहिला मजला एनसीसी प्लॉट नं ५९ गेट नं ०७ मालवणी मालाड वेस्ट) यांना विक्री केले असल्याचे सांगितले. मुंबई येथे जावुन सदर आरोपींचा शोध घेवुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करुन सदर आरोपींकडून एकुण १२ लाख रुपये किंमतीचे एकुण १२० वेगवेगळया कंपन्यांचे मोबाईल फोन व ०१ लाख रुपये किंमतीचे वेगवेगळया कंपनीचे ०३ लॅपटॉप तसेच
सॉफ्टवेअर मारण्याचे एकुण ०३ डिव्हाईस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयांमध्ये आणखीन ०३ पाहिजे आरोपी असुन सदर आरोपीतांची मोठी आंतरराजीय टोळी असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले स्वारगेट पोलिस स्टेशन हे करीत आहेत.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, सह-आयुक्त सो, पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग,
पुणे शहर, स्मार्तना पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- २. पुणे शहर, नंदिनी वग्यानी सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप फुलपगारे, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मा.गीता बागवडे यांच्या आदेशान्वये पथकातील सहा.पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले, पो/अं ७८९९ हर्षल शिंदे, पो/अं १००६२ फिरोज शेख, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं १०१४७ संदीप घुले, पो/अं ९९६३ दिपक खेदाड, पो/अं ९८२० अनिस शेख, पो/अं १००१६ शिवा गायकवाड, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अं ३५४१ प्रविण गोडसे यांनी एकत्र मिळून केली आहे.

पुणे शहरात महिलांना लक्ष करून लुटणाऱ्या सराईत महिलेसह एकाला अटक…

पुणे शहरात पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात; टँकरनं अनेकांना उडवले…

पुणे जिल्ह्यात मोटारसायकल चोरांना अटक; १४ दुचाकी हस्तगत…

पुणे शहरात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही युवकांची पटली ओळख…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!