संतापजनक! शिक्षक असलेल्या बापानेच चिमुकलीवर केला अत्याचार…

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक असलेल्या बापानेच ३ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने ३५ वर्षीय बापाविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. बेगमपुरा पोलिसांनी बापाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

चाऊस कॉलनीत राहणारा हा शिक्षक एका इंग्रजी शाळेत शिकवतो. त्याला तीन वर्षांची मुलगी आणि दोन महिन्यांचा मुलगा आहे. रविवारच्या दिवशी दुपारी घरी एकटाच असताना त्याने तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. चिमुकलीला रात्री अचानक ताप आल्यामुळे आईने पाहिलं असता तिच्या प्रायव्हेट पार्टमधून रक्त येत असल्याचे दिसले.

मुलीला वेदना सुरू झाल्यानंतर विचारपूस केल्यानंतर आई थेट बेगमपुरा पोलीस ठाण्यात गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत बापाला अटक केली. बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत 9 ते 12 ऑक्टोबरदरम्यान ही संतापजनक घटना घडली आहे. मुलगी लहान असून बाल समितीसमोर तिचा जबाब नोंदवून तपास करणे, पुरावे गोळा करणे आदी कामे सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

डॉक्टरने केला तीन युवतींवर अत्याचार; प्रायव्हेट पार्टवर गोंदवले नाव…

डॉक्टर, डॉक्टर खेळण्याच्या बहाण्यातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार अन् गरोदर…

अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने राखी पौर्णिमेच्या दिवशी केला अत्याचार…

अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!