पंढरपूरमध्ये प्रेमप्रकरणातून कोयत्याने हल्ला; पोलिसकाकामुळे वाचला जीव….

पंढरपूर: पंढरपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकावर कोयत्याने हल्ला करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु, वाहतूक पोलिस आल्याने हल्लेखोर फरार झाला आणि पुढील अनर्थ टळला आहे. नाना निमकर हे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकावर कोयत्याने वार झाल्याची घटना आज (गुरूवारी) सकाळी घडली. परंतु, वाहतूक पोलिस येताच हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. घटनेतील मोटार सायकल सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. मुलीच्या प्रेम प्रकरणावरून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती आहे, तर जखमी व आरोपी दोघेही पंढरपूर शहरातील डाळे गल्ली भागातील आहेत.

पंढरपुर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रेमाला विरोध केल्याने प्रियकराने प्रेयसीच्या चुलत्यावर कोयत्याने आज सकाळी हल्ला करून चुलत्याला जखमी केले आहे. पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. शिवाय, जखमी चुलत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. भर रस्त्यावर हा जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाना निमकर आज सकाळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोटारसायकल वरून जात असताना संशयित आरोपी अमित वाठारकर याने धारदार कोयत्याने वार केले. आरोपीने निर्घृणपणे कोयत्याने वार केले आहेत. जवळच असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्यांने घटनास्थळी धाव घेतल्याने जखमीचा जीव वाचला. ही घटना घडताच पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रेम प्रकरणातून हा हल्ला झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…

सतीश वाघ यांची हत्या! पत्नीचे मुलाच्या मित्रासोबत प्रेमसंबध; A to Z घटनाक्रम…

पुणे शहरात IT कंपनीतील युवतीवर कोयत्याने वार करून सहकाऱ्याने केला खून…

धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…

हृदयद्रावक! पिंपरीमधील रिक्षा चालकाची अंगावर काटा आणणारी सुसाईड नोट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!