
पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…
अहमदनगर : पदोन्नतीमध्ये भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत दोन दिवसात पदोन्नतीची यादी न बदलल्यास आत्महत्या करेन, असे पत्र पोलिसकाकाने लिहिले असून, या पत्रामुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये रामनाथ भाबड हे हेड कॉन्स्टेबलपदी कार्यरत आहेत. दोन दिवसांत प्रमोशन न मिळाल्यास आत्महत्या करणार असल्याचे निवेदन पोलिस अधिक्षकांना दिले आहे. शिवाय, पोलिस महासंचालक, विशेष पोलिस महानिरिक्षक आणि पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले आहे. संबंधित पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
पोलिस हेड कॉन्स्टेबल यांनी पत्रात म्हटले की, ‘दोन दिवसांच्या आत प्रमोशन यादीत बदल न केल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेल. पदोन्नती करताना पक्षपातीपणा, भ्रष्टाचार झाला आहे. पदोन्नती मार्कांनुसार आणि सेवाज्येष्ठतेनुसार झाल्याचे दिसून येत नाही. यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार केल्यासारखे दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या आत मार्कानुसार आणि सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती न काढल्यास अज्ञात ठिकाणी आत्मदहन करेन. याची जबाबदारी अहमदनरच्या पोलिस अधीक्षकांची राहिल.’

पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…
पोलिसकाकाने मैत्रिणीसोबत झालेल्या भांडणानंतर केली आत्महत्या…
पुणे-बंगळुरू महामार्गावर पोलिसकाकासह तिघांचा जागीच मृत्यू…
Video: पोलिसकाकाने आजीला उचलून घेत घडवलं देवाचं दर्शन…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

