
नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूचे वाढले गूढ; संशय बळावला…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण या युवतीच्या मृत्यूचे गूढ कायम असून, दररोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत. नीलिमा चव्हाण हिच्या घातपाताचा संशय बळावला आहे. नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणी दोन युवक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. नीलिमा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असून, नीलिमाचा घातपात की आत्महत्या लवकरच उघड होणार आहे.
नीलिमा शेवटचे एका दांपत्याला भेटली होती. त्यानंतर एक मुलगी तिच्या हाताला धरून बसमध्ये चढत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तसेच नीलिमा चव्हाण ही एका युवकाला शेवटचं भेटली होती अशी ही माहिती समोर येऊ लागली आहे. काही दिवसापूर्वी नीलीमाने एका तिच्या मित्राला मी जीवनाला कंटाळले आहे, असा मेसेज केला असल्याचे पोलिस तपासात समोर येत आहे.
पोलिस नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाचे सर्व पैलू तपासत आहेत. सध्या तिच्या एका sms ने आणखी गूढ वाढले. मी जीवनाला कंटाळले असा मेसेज मित्राला केल्याने तपासाची दिशा बदलली आहे.
पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी येथे नीलिमा चव्हाण हिच्या नातेवाईकांना रत्नागिरी येथे बोलावून घेतले. त्यांना या प्रकरणातील तपासाची माहिती दिली जाणार आहे. तसेच त्यांच्याकडून काही गोष्टी पोलिसांना जाणून घ्यायचे आहेत. नीलिमा एका पायाने जखमी झाली होती, तिच्या पायात लोखंडी राड टाकण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे.
बँक कर्मचारी नीलिमा घरी पोहचलीच नाही; आढळला मृतदेह…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…