एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…
मुंबई : पवई येथे एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये आत्महत्या केली आहे. रुपल ओगरे हिच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवाल याला अटक केली होती. तो पोलिस कोठडीत होता. त्याने पँटच्या सहाय्याने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
रुपल ओगरे या एअर होस्टेसचा तिच्याच इमारतीमध्ये हाउस किपिंगचं काम करणाऱ्या विक्रमने खून केला होता. खून प्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये त्याने आज (शुक्रवार) सकाळी साडे सहाच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात नेण्यात आला असून त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
दरम्यान, पवई परिसरात रुपल ओगरे (वय २३) या हवाई सुंदरीची (एअर हॉस्टेस) हत्या झाली होती. एनजी कॉम्प्लेक्समध्ये ती बहीण आणि मित्रासोबत राहात होती. पण दोघेही गावी गेले होते. तिचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकाने मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवला होता. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना पकडण्यासाठी ४ पथके पाठवण्यात आली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबईत एअर होस्टेस गळा चिरून हत्या; एकाला अटक…
मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…
Video: मुंबईतील महिलेचे श्वानासोबत धक्कादायक कृत्य…
प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…