किरीट सोमय्या व्हिडीओ प्रकरणी वृत्तवाहिनीच्या संपादकावर गुन्हा दाखल…
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 500 (मानहानी) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ई) आणि 67 (ए) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
कमलेश सुतार आणि अनिल थत्ते यांच्यावर सायबर पोलिस उपायुक्त यांच्या देखरेखीखाली पूर्व सायबर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली. त्यानुसार मुंबई गुन्हे शाखेकडे तपास सोपवण्यात आला आणि सायबर पोलिसांनी तपास हाती घेतला. मंगळवारी किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी आपला जबाब दिल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आणि रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी यासंदर्भात वृत्त दिले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा सभागृहात मांडत किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या यांनी धमकावून किंवा भीती दाखवून काही मराठी भगिनींचे शोषण केल्याचेही आमच्या कानावर आल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला होता. तसेच अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्या यांच्या व्हिडीओ क्लिप्स असलेला पेनड्राईव्ह सभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.
भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…
मुंबईमधून शिक्षिका मारिया खान बेपत्ता; काही अघटित तर नाही ना…
भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…
आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…
नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…