नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यामधील ढवळपुरी वारकरी परंपरेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) तब्बल पाच वर्ष धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय, आरोपीने मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देत अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

पीडित मुलगी इयत्ता आठवीत शिकत असतानाच हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या घराशेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये कौटुंबिक संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्या वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत असल्याचा फायदा घेत आरोपीने 2021 पासून पीडित मुलीवर वाईट नजर ठेवली. मुलगी घरी एकटी असताना त्याने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला आहे. पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. ‘मी दोन हाफ मर्डर केले आहेत, जर कोणाला काही सांगितलं तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन,’ अशी भीती दाखवली.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

कुटुंबाला काही होऊ नये म्हणून पीडितेला हा छळ अनेक वर्ष गुपचूप सहन करावा लागला. दरम्यान, 10 मार्च 2026 रोजी या अत्याचाराचा कळस गाठला. आरोपीने पीडितेला फोन करून आपल्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता आरोपीने तिला कॉम्प्यूटर रूममध्ये नेऊन बांबू व चापट्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर स्वयंपाकघरातील लोखंडी पकड गॅसवर तापवून तिच्या शरीरावर चटके देत अमानूष अत्याचार केला. या क्रूर मारहाणीमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते.

14 मार्च 2026 रोजी तिचा भाऊ घरी आल्यानंतर तिची गंभीर अवस्था पाहून त्याने तिला विश्वासात घेतले. त्यानंतर मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने मागील पाच वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचाराचा सर्व कहाणी सांगितली. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘भोंदू’ महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

नाशिक! भोंदूबाबाची महिलेली धमकी; माझ्यासोबत शरीरसंबंध ठेव नाहीतर…

पुणे! भोंदूबाबाचे अश्लील चाळे; चिठ्ठीवर तारीख लिहायचा अन्…

भोंदूबाबाने अल्पवयीन मुलींना नग्नावस्थेत पुजेला बसावे लागेल सांगून केले लैंगिक शोषण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!