बीट मार्शलकडून पोलिस अधिकाऱ्याला बेदम मारहाण…

नागपूर: नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका पोलिस अधिकाऱ्याला काही पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असलेल्या पोलिस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. संबंधित व्यक्ती पोलिस अधिकारी असल्याचे समजल्यानंतरही त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

पोलिसांनीच पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिस प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलिस करत आहे. मारहाण झालेले पोलिस अधिकारी नक्षलविरोधी पथकात पोलिस निरीक्षक आहेत. रविवारी रात्री ते नागपूरच्या वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये गेले होते. याठिकाणी नागपूर पोलिसांच्या दोन बीट मार्शलने संबंधित पोलिस निरीक्षकला बारमधून ओढत पोलिस ठाण्यात आणले आणि मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे पोलिस ठाण्यात आल्यानंतर संबंधित पोलिस अधिकाऱ्याने आपली ओळख सांगितली होती. पण ओळख सांगितल्यानंतरही दोन्ही बीट मार्शलने त्यांना मारहाण केली आहे.

दरम्यान, या मारहाणीत पीडित पोलिस निरीक्षकाचा कानाचा पडदा फाटला आहे. या धक्कादायक प्रकारानंतर वाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज मडावी असे गुन्हा दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!