
Video: बिबट्याने गाठले थेट पोलिस ठाणे अन् पकडली मान…
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरात बिबट्याच्या मुक्त संचार वाढला असून, राजापूर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या व्हरांड्यातुन बुधवारी (ता. २४) मध्यरात्री एका कुत्र्याच्या मानेला पकडून नेले आहे. संबंधित घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
बिबट्याने थेट पोलिस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे. बिबट्याने राजापूर तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्याच्या व्हरांड्यात एका कुत्र्यावर हल्ला केला आणि त्याला पकडून घेऊन गेले. बुधवारी मध्यरात्री साडेतीनच्या दरम्यान तो प्रकार घडला. त्यावेळी काही पोलिस कर्मचारी ड्युटीवर होते. त्यांनी देखील तो प्रकार पाहिला.
बिबट्या चार पाच कुत्र्यांचा पाठलाग करीत पोलिस ठाण्याच्या मागील बाजुने आत घुसला. बिबट्याने आजुबाजुला कुणी नसल्याचा अंदाज घेतला आणि पुढे सरकला. यावेळी जीवाच्या आकांताने धावणारी कुत्री इकडुन तिकडे पळत होती. मात्र पुढे पळण्यासाठी मार्ग नसल्याने ती पुन्हा माघारी फिरत होती. बिबट्याने एका बाजूला घुसून एका कुत्र्याला पकडले आणि तुरुंगाच्या दिशेने असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजुने पसार झाला. हा प्रकार राजापूर पोलिस ठाण्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दरम्यान, राजापूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी रात्रीच्या वेळी ड्युटीवर कार्यरत असतात. तर काही कर्मचारी रात्रीची डुटी उशीरा संपल्यामुळे तेथेच मुक्कामी असतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Video: पोलिस ठाण्यात रात्रीच्या वेळी घुसला बिबट्या अन् पकडली मान…
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याच्या व्हरांड्यातुन कुत्र्याच्या मानेला पकडून नेले आहे.https://t.co/42LUDp6Iqz#leopard #Police #PoliceKaka @RatnagiriPolice pic.twitter.com/CP3eXJz3sX— policekaka News (@policekaka) January 25, 2024
Video: खाकी वर्दीतला देव चिमुकलीच्या मदतीला धावला…
वर्दीतील सुपरवुमन! डॉ. शितल खराडे-जानवे….
जयश्री देसाई: खाकी वर्दीतील दामिनी!
नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाचा आरोपीला दणका…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

