संतापजनक! पुणे जिल्ह्यात मार्कशीटवर खाडाखोड केल्याने मुलीला क्रूरपणे संपवलं…

पुणे : पुणे जिल्ह्यात जन्मदात्या बापाने आपली पोटच्या मुलीला अमानुषपणे संपवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, भावाच्या मार्कलिस्टवरती खाडाखोड केल्याच्या रागातून बापाने लाकूड कापण्याच्या यंत्राने केलेल्या अमानुष मारहाणीत नऊ वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील देऊळगावराजे हद्दीत हनुमानवस्ती येथे रविवारी (ता ३ मे) दुपारी घडली आहे. चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी आरोपी बाप शांताराम चव्हाण (वय ३३) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृत मुलीचे नाव अनामिका आहे. गुन्हा लपविण्यास मदत केल्याप्रकरणी चिंगू भोसले (रा. देऊळगावराजे) हिलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने मुलीला मारहाण केली. घरातील लाकूड कापण्याच्या यंत्राचा वापर करून तिला मारहाण केली, यामध्ये ती गंभीर जखमी झाली. घटनेच्या वेळी मुलगी मदतीसाठी आक्रोश करत होती. मात्र, तिला वाचविण्यास कोणीही पुढे आले नाही. या हल्ल्यात तिचा जागीच मृत्यू झाला. गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने मुलीचा मृतदेह साडीमध्ये गुंडाळून घराला आग लावली. मृत मुलीचा भाऊ संस्कार (वय १०) याने घडलेला प्रकार नातेवाइकांना सांगितल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोटच्या लेकीला संपवल्यानंतर त्याने क्रूरतेची सर्व सीमा पार केली. हा खून नसून अपघात आहे असे भासवण्यासाठी त्याने मुलीचा मृतदेह साडीत गुंडाळून घरात ठेवला आणि घराला आग लावून दिली. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या चिंगु भोसले हिनेही ही गंभीर बाब पोलिसांपासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महाराष्ट्र दिनी पुणे जिल्ह्यात चिमुकलीवर अत्याचार केल्यानंतर ठेचून केली हत्या…

मनोहर मामाचा आणखी एक कारनामा समोर, पोलिसांनी पुणे जिल्ह्यातून उचललं…

पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाने केला अत्याचार; गरोदर राहताच…

पुणे जिल्ह्यात प्रेमासाठी चिमुकल्याची आईने केली अत्यंत क्रूरपणे हत्या…

पुणे जिल्ह्यात आईने आवळला मुलीचा गळा अन् मुलासह घेतली विहिरीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!