पुणे! देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी केले जेरबंद…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील स्वारगेट पोलिस स्टेशन हद्दीत देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्यास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्टल व मॅक्झीनमध्ये ०१ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,५०० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे. स्वारगेट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पो/हवा. ७७१० केकाण, पो.हवा. ४१०२ भांदुर्गे, पो/अंम. १०००५७ सुजय पवार, असे ३०/०४/२०२६ रोजी १३/३० वा सुमारास स्वारगेट पोलिस स्टेशन हददीत इंदिरानगर डायसप्लॉट परीसरात गुन्हे प्रतिबंधात्मक पेट्रोलिंग करीत होते. तपास पथकातील पोलिस अंमलदार सुजय पवार व नाना भांदुर्गे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, काळया रंगाचा हाफ बाहीचा टी-शर्ट व ऑफ व्हाइट रंगाची जीन्स पँट परिधान केलेला एक इसम कमरेस पिस्टल बाळगुन ढोलेमळा परीसरामध्ये फिरत असल्याची बातमी मिळाली होती.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 150 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पीएमटी कॉलनी डायसप्लॉट परिसरामध्ये मिळालेल्या बातमी प्रमाणे वर्णनाचा व्यक्ती पडक्या बिल्डींगजवळ उभा असल्याचे दिसला. पोलिस त्याच्या दिशेने जाताच तो निघुन जात असताना त्याचा पाठलाग करुन शिताफिने त्यास ताब्यात घेतले. सौरभ भरत आवळे (वय २४ वर्षे रा. हनुमान मंदीराजवळ ढोले मळा डायसप्लॉट गुलटेकडी पुणे) असे त्याचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला एक देशी बनावटीचे गावठी पिस्टल व मॅक्झीनमध्ये ०१ जिवंत काडतुसे असा एकुण ४०,५००/- रुपये किंमतीचा माल मिळून आला. त्याचे विरुध्द स्वारगेट पोलिस स्टेशन गु.र.नं. ९९/२०२६ भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) सह १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करुन सदर आरोपीस दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस आयुक्त, पुणे शहर, रंजन कुमार शर्मा, सह-आयुक्त, पुणे शहर, राजेश बनसोडे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर, मिलींद मोहीते, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ- २ पुणे शहर, धन्यकुमार गोडसे, सहा.पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत निकम, स्वारगेट पोलिस स्टेशन पुणे शहर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विकास भारमळ यांचे आदेशान्वये तपास पथकातील सहा.पोलिस निरीक्षक अभिजीत पाटील, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलिस हवालदार ४१०२ दिनेश भांदुर्गे, पोलिस हवालदार ७७१० सागर केकाण, पोलिस हवालदार ७८९९ हर्षल शिंदे, पोलिस हवालदार २६८४ अश्रुबा मोराळे, पोलिस हवालदार ८२३७ प्रशांत टोणपे, पो/अं १००५७ सुजय पवार, पो/अं १००६८ रमेश चव्हाण, पो/अंम १०२४४ सागर काळे, पो/अं २१९० हनुमंत दुधे, पो/अं १०१४७ घुले, पो/अंम ८५१५ संग्राम केंद्रे, पो/अं ९९६३ दिपक खेंदाड यांनी एकत्र मिळून केली आहे.

पुणे! नसरापूरमधील मुलीचा शवविच्छेदन अहवाल समोर; आरोपीने काय केले पाहा…

नसरापूर! पोलीस मध्यरात्रीच्या अंधारात आरोपीला गुपचूप ‘त्या’ जागेवर घेऊन गेले अन्…

पुणे शहरात अल्पवयीन मुलीवर नातेवाईकाने केला अत्याचाराचा प्रयत्न…

पुणे! चतु:श्रृंगी पोलिस स्टेशन हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्यास मुद्देमालासह अटक…

पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!