
बदलापूर पुन्हा एकदा लैंगिक शोषणाच्या घटनेनं हादरलं…
बदलापूर : बदलापुरात शाळेच्या व्हॅनमध्ये बसचालकाने एका चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर लैंगिक शोषण केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत असताना व्हॅन चालकाने तिच्यावर अत्याचार केला. घरी पोहोचल्यावर विद्यार्थिनीने आई वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. संतापलेल्या पालकांनी तातडीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. ज्या व्हॅनमध्ये हा प्रकार घडला त्या व्हॅनची तोडफोड करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या संगीत चेंदवणकर यांनी केला आहे. बदलापुरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
बदलापूर पश्चिमेकडील एका खाजगी शाळेत चार वर्षांची चिमुकली शिकत होती. ती नेहमीप्रमाणे दुपारी 12.30 वाजेपर्यंत स्कूलव्हॅन मधून घरी न परतल्यामुळे तिच्या आईने व्हॅन चालकाकडे फोन करून विचारणा केली. त्यानंतर साधारण दीड तासानंतर चिमुकली घरी आली. ती अत्यंत भेदरलेल्या अवस्थेत होती. तिच्या आईने तिच्याकडे विचारणा केली असता तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर चिमुकलीच्या पालकांनी तत्काळ पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी व्हॅन चालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.
सदर घटनेबाबत सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी माहिती दिली. बदलापूर पश्चिम पोलिस स्टेशन अंतर्गत सदर घटना येते. एका मुलीवर आरोपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. आरोपी अटकेत आहे, मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. सदर प्रकार हा स्कुल व्हॅन मध्ये घडल्याची माहिती आहे. ही स्कुल व्हॅन खासगी शाळेची होती, पोलिस चौकशी करून पुढील कारवाई करतोय. सदर घटनेत फिर्यादीने माहिती दिली की सदर आरोपीने दुपारी 2-3 दरम्यान ड्रायव्हरने गुप्तांगाला हात लावला, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.
बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
बदलापूरमधील शाळेच्या ट्रस्टींना अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…
Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

