बीड! शिक्षकाची आणखी एक विकृती समोर; गुन्हा दाखल…

बीड: बीडच्या उमाकिरण शैक्षणिक संकुलामध्ये विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषण प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या विजय पवार याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. विजय पवार याने स्वत:च्या मालकीच्या ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थिनीचा दोन वर्षांपूर्वी छळ केला होता. पालकांनी फी न दिल्याचे कारण सांगत आरोपीने पीडित विद्यार्थिनीशी विकृत कृत्य केले होते.

बीडच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पीडितेच्या पालकांनी आता या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दोन वर्षांपूर्वी आरोपी विजय पवारने आपल्या मुलीचा विनयभंग केला होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. आरोपीने पीडितेच्या जातीचा उल्लेख करत विनयभंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, विजय पवार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून चौकशीसाठी पोलिस आता पुन्हा एकदा पोलिस कोठडी मागू शकतात. दरम्यान दोन दिवसांपूर्वी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी बीडमध्ये भेट देत पोलिसांना या प्रकरणात सखोल चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. उमाकिरण शैक्षणिक संकुलातील मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. आता विजय पवार यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल आहे. अशाप्रकारे आणखी कोणासोबत आरोपीने अशाप्रकारे विकृत कृत्य केले असेल, तर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…

बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

बीड पोलिस अधीक्षकांच्या घरात धक्कादायक प्रकार, पोलिस कर्मचारी निलंबित…

बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!