
बीडच्या क्लासमध्ये मुलीचं लैंगिक शोषण; केबिनमध्ये बोलावायचे अन् नको ते…
बीडः पीडित मुलगी क्लासला आल्यानंतर दोन शिक्षकांनी मुलीला कॅबिनमध्ये बोलावून घेत तिचा लैंगिक छळ केला आहे. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांनी दोन शिक्षकांविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांची नावे आहेत. ते दोघेही बीडमधील प्रसिद्ध उमा किरण शैक्षणिक संकुलात काम करतात.
आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षिरसागर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांचे विविध राजकीय नेत्यांसोबत देखील फोटो आहेत. अशा राजकीय कनेक्शन असलेल्या शिक्षकांनी एका अल्पवयीन मुलीचा लैंगिक क्षळ केल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
विजय पवार आणि प्रशांत खाटोकर हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात. या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता. घडलेला प्रकार मुलीने आपल्या मैत्रिणीला सांगितला. मात्र, शिक्षकांकडून होणारा त्रास असाह्य झाल्याने मुलीने हा संपूर्ण प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक अद्याप फरार आहे.
पीडित मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11 वीचे अॅडमीशन घेतले असून एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधुन बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाईम दुपारी 2 ते दुपारी 6 पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझा कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.’
‘मला प्रशांत खाटोकर सर यांचा बॅड टच आवडत नसायचा म्हणून विजय पवार सर यांना सांगीतले तेव्हा ते मला म्हणाले की, ‘त्यांना आम्हीच ठेवले, मुलींना त्रास देण्यासाठी. असे म्हणून ते पण माझ्यासोबत वाईट वागायला लागले व ते मला केबिनमध्ये कोणी नसताना किस करायचे माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. ते मला सर्व मुले दुसऱ्या क्लासला गेले की, बाजूला बोलवायचे व एकटीला थांबून ठेवायचे. तेव्हा सर्व क्लासमधील मुले माझ्याकडे वाईट नजरेने बघायची. ते मला आवडत नसायचे. मी ही झालेली घटना माझ्या मैत्रिणीला सांगितली. तेव्हा ती मला म्हणाली की, ते आपले सर आहेत आपण त्यांचा रिस्पेक्ट करायचा. त्यामुळे मला या गोष्टीचा त्रास होऊ लागल्यामुळे हा झालेला प्रकार मी माझ्या आई-वडीलांना सांगितला आणि त्यानंतर आई-वडील मला तक्रार द्यायला पोलिस ठाण्यात घेऊन आले,’ असे या मुलीच्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे. राजकीय कनेक्शन असलेल्या आणि एका प्रसिद्ध क्लासमधील शिक्षकांनी अशाप्रकारे विद्यार्थिनीचा छळ केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्यात आहेत तरी काय?
जळगाव! शिक्षकाने शाळेतील वर्गातच घेतला गळफास…
क्रिकेटचा वादावरून विद्यार्थ्याने केली विद्यार्थ्याची शाळेतच हत्या…
पुणे शहरात महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या भाजप नेत्यावर कारवाई; पाहा गुन्हे…
शिक्षक नवरा नवविवाहीत पत्नीला हसायला सांगायचा अन् फोटो काढायचा…
प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…
मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…
Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

