रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाची अवस्था पाहून बहिणीने फोडला हंबरडा…

औरंगाबाद : रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाने आपल्या बहिणीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बलुजा भागातील बजाजनगरात परिसरात घडली आहे. आकाश सर्जेराव शिंदे (वय 30, रा. खैरका, ता. मुखेड, जि नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एका कंपनीत काम करत होता. दरम्यान तो औरंगाबाद येथे बहिणीच्याच घरी वास्तव्यास होता. तर, त्याची बहीण सुनंदा गोविंद गोंधळे याही एका कंपनीत कामाला आहेत. सुनंदा व त्यांचे पती गोविंद गोंधळे हे दोघे बुधवारी (ता. ३०) सकाळी कामासाठी निघून गेले होते. रक्षाबंधन असल्याने मी आज घरीच थांबतो असे आकाशने बहिणीला सांगितले होते. तसेच कामावरुन आल्यानंतर रक्षाबंधन साजरा करण्याचे त्यांनी ठरवले होते.

सुनंदा या दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी आल्या होत्या. आकाशला बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा उघडत नसल्याने सुनंदा यांनी खिडकी उघडून घरात पाहिले असता, आकाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. आकाशला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून बहिणीने हंबरडा फोडला. दरम्यान याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करुन पंचनामा केला आहे. तर या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, आकाशने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचे समोर आले आहे. ‘ताई मला माफ कर, आईची काळजी घे’ असे यात उल्लेख असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…

हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…

घराचा दरवाजा उघडताच मुलाची अवस्था पाहून आईने फोडला हंबरडा…

हृदयद्रावक! कट्टा चालवायचा माहित नसल्याने गोळी सुटली अन् लेकराचा बळी…

हृदयद्रावक! जवान वैभव भोईटे यांना दीड वर्षांच्या लेकीने दिला अग्नी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!