पुणे शहरात लहान सिंलेडरमध्ये अवैध रित्या गॅस भरताना पकडले…

पुणे (संदिप कद्रे): घरगुती गॅस सिलेंडर मधून अवैध रित्या लहान सिंलेडर टाक्यामध्ये गॅस भरताना सिंहगड रोड पोलिसांनी धाड टाकून दोन आरोपींना जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सपोनि सचिन निकम, पोउपनिरी संतोष भांडवलकर, पोहवा २४६ तारु, पोशि ८३४२ पाटील, पोशि १०२१५ मगर, पोशि ७२७५ बांदल, पोशि ८६९० पांडोळे, पोशि ८६०० चव्हाण असे सिंहगड रोड पोलिस स्टेशन येथे तपास पथक कार्यालयात हजर असताना देवा चव्हाण यांना त्याचे खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, लेन २९ (ए) गारवा बिर्याणी दुकानाच्या समोर धायरी पुणे येथील एका रुम मध्ये काही व्यक्ती हे अनाधिकृत पणे स्वतःचे आर्थिक फायद्या करीता सिंलबंद गॅस सिलेंडर मधून लोंखडी रिफिल पाईपच्या सहाय्याने रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये गॅस रिफिल करुन पुन्हा सिल बंद करुन त्यांची विक्री करीत आहेत. याबाबतची माहिती सपोनि निकम यांना कळविली असता त्यांनी सदरची बातमी वरिष्ठांनी कळविली असता वरिष्ठांनी बातमीची खात्री करुन योग्यती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

पोलिसांनी घटनास्थळी जावुन बातमी प्रमाणे खात्री करता दोन जण त्यांचे पत्र्याचे रुम मध्ये घरगुती सिलबंद गॅस सिलेडर मधुन नॉबच्या सहाय्याने दुसऱ्या रिकाम्या लहान गँस सिलेडर मध्ये रिफिल करीत असताना दिसल्याने सदर ठिकाणी २४/०३/२०२४ रोजी १३/३० वा. अचानकपणे छापा मारला असता सदर ठिकाणी दोन जण मिळून आले. १) आशिष अशोक मोरे (वय २७ वर्षे रा. आकाश दिप कॉम्प्लेक्स प्लॅट नं १०२ धायरी पुणे), २) अमर सुर्यकांत शेडोळे (वय २५ वर्षे रा. लेनं २९ ए गणेशनगर धायरी पुणे मुळ गाव- मुपो आंबी सांगवी ता भालकी जि बिदर राज्य कर्नाटक) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत.

घरगुती गॅस हा नॉबच्या सहाय्याने त्यांच्याकडील लहान टाक्यामध्ये रिफिल करुन तो बाजारात अवैधपणे विक्री करीत असल्याने घटनास्थळावर त्यांचे जवळ लहान व मोठे २८ गॅस सिलेंडर एक वजन काटा, नॉब, रेग्युलेटर असलेला गॅस पाईप, पाना, दोन स्क्रु डायव्हर, असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन आरोपी यांचे विरुध्द सिंहगड रोड पो स्टेशन गुन्हा रजि नं १७६/२०२४ भादंवि कलम २८५,३४ तसेच जिवनावश्यक वस्तुचा कायदा १९५५ चे कलम ३,७ अन्वये दाखल करण्यात आला आहे. पुढील अधिक तपास सहा पोलिस निरीक्षक सचिन निकम हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, प्रविण पवार, पोलिस सह आयुक्त पुणे शहर, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर संभाजी कदम, पोलिस उप-आयुक्त परीमंडळ -३, पुणे शहर, भिमराव टिळे, सहा पोलिस आयुक्त, कोथरुड विभाग अतिरिक्त पदभार सिंहगड रोड विभाग, पुणे शहर, विजय कुंभार, वरीष्ठ पोलिस निरीक्षक, सिंहगड रोड पोलिस स्टेशन पुणे शहर, राघवेंद्रसिंह क्षीरसागर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सिंहगड रोड पो स्टे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक सचिन निकम, पोलिस उप निरीक्षक, संतोष भांडवलकर, पोलिस अंमलदार, आबा उत्तेकर, संजय शिंदे, उत्तम तारु, राजु वेगरे, विकास बांदल, अमोल पाटील, विकास पांडोळे, देवा चव्हाण, शिवाजी क्षिरसागर, राहुल ओलेकर, सागर शेडगे, स्वप्नील मगर, विनायक मोहीते यांचे पथकाने केली.

पुणे शहरात मुलीबाबत अपशब्द वापरल्याने युवकाचा खून…

पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एकाच दिवशी 12 सराईत गुन्हेगार तडीपार…

पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…

धक्कादायक! पुणे शहरात छेडछाडीला कंटाळून युवतीने घेतले पेटवून…

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!