नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…

मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे.

नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. बस अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. जखमींना बाहेर काढण्यासाठी नेपाळच्या लष्कराची मदत घेण्यात आली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमधील सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव, पिंपळगाव, तळवेल या गावातले आहेत. 16 तारखेपासून अयोध्या, नेपाळ, काठमांडू येथे देवदर्शनासाठी गेले होते. 16 ते 28 ऑगस्टपर्यंत त्यांचा प्रवास ठरला होता. यासाठी त्यांनी दोन बसेस उत्तर प्रदेशातून बूक करण्यात आल्या होत्या.

पोखराहून काठमांडूला निघालेल्या पर्यटकांची बस मुखलिसपूरजवळ दरीत कोसळली. गोरफूरच्या केसरवानी ट्रॅव्हल्समध्ये महाराष्ट्रातील ४१ प्रवासी होते. गोरखपूरच्या चालकासह १४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रयागराज रेल्वे स्थानकाहून महाराष्ट्रातील ११० पर्यटकांचा ग्रुप चित्रकूटला गेला. तिथून अयोध्या, लुम्बिनी मार्गे ते नेपाळच्या पोखरा येथे पोहोचले. आज ते काठमांडूला निघाले होते. दरम्यान, बसला अपघात झाला आहे.

मृतांचे पार्थिव लवकरच महाराष्ट्रात आणणार : देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने तत्काळ नेपाळ दुतावासाशी संपर्क साधला असून, जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकार्‍यांशी सातत्याने संपर्कात आहेत. एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत देत असून नेपाळ सीमेवर ते जाणार आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देणे, यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपर्कात आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तरप्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच, महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, स्वत: मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असेही फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

भीषण दुर्घटना! नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू…

मोठी दुर्घटना! नेपाळमध्ये प्रवाशांनी भरलेल्या दोन बस नदीत कोसळल्या…

नेपाळमध्ये भीषण अपघात 6 भारतीय भाविकांसह 7 जणांचा मृत्यू…

मोठं मन! बिहारमध्ये कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा…

Video: ‘खैके पान बनारस वाला’ या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!